IAS Pooja Khedkar Sarkarnama
प्रशासन

MPSC News : 'यूपीएससी' नंतर आता 'एमपीएससी' मध्येही पूजा खेडकर प्रकरणाची पुनरावृत्ती

IAS Pooja Khedkar Case : यूपीएससी तसेच केंद्र सरकारच्यावतीने खेडकर यांची चौकशी सध्या सुरू आहे. आयएएस परीक्षा देताना त्यांनी अपंगत्वाचे खोटे प्रमाणपत्र दिल्याचा आरोप करण्यात आला असून त्याची चौकशी देखील सुरू आहे.

Chaitanya Machale

Pune News : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन आयएएस म्हणून निवड झालेल्या पूजा खेडकर वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. यूपीएससी तसेच केंद्र सरकारच्यावतीने खेडकर यांची चौकशी सध्या सुरू आहे. आयएएस परीक्षा देताना त्यांनी अपंगत्वाचे खोटे प्रमाणपत्र दिल्याचा आरोप करण्यात आला असून त्याची चौकशी देखील सुरू आहे.

यूपीएससी (UPSC) प्रमाणेच राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत देखील वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांच्या सारखे प्रकार घडले असल्याचे आरोप आता होऊ लागले आहेत. एमपीएससीच्या परीक्षेत निवड झालेल्या आठ जणांनी अपंगत्वाचे खोटे दाखले दिल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे या निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने अर्जदार आणि प्रतिसादकर्त्यांनी अपिलीय प्राधिकरणासमोर उपस्थित राहून दिव्यांग प्रमाणपत्रांची पुन्हा पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा- 2022 च्या निवड यादीतील 8 जणांविरुद्ध या तक्रारी असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी सांगितले. प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी असलेल्या पूजा खेडकर यांच्याबाबत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून एमपीएससीने हा निर्णय घेतला असल्याचे बोलणे जात आहे. अपंगत्वाच्या दाखल्याच्या आधारे अशा प्रकारे पदे मिळविण्याचा प्रयत्न झालेला असल्यास ही माहिती देखील आता समोर येण्याची शक्यता आहे. तसेच यापुढील काळात अशा पद्धतीची प्रकरणे समोर येऊन 'एमपीएससी'च्या (MPSC) कारभारावर कोणताही ठपका ठेवला जाऊ नये, यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

एमपीएससीच्या परीक्षेत पात्र झालेल्या ज्या उमेदवारांच्या बाबतीत या तक्रारी आलेल्या आहेत. त्यांना आपल्या प्रमाणपत्रांची पडताळणी करावी लागणार आहे. या पडताळणीचे निर्णय 5 ऑगस्ट 2024 पर्यंत संबंधित प्राधिकरण आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ला कळविणे गरजेचे आहेत. संबंधित उमेदवार अपिलीय प्राधिकरणासमोर गैरहजर राहिल्यास त्याने दिलेले दिव्यांगाचे प्रमाणपत्र संशयास्पद मानलं जाऊन त्यांना या निवड प्रक्रियेतून वगळलं जाईल असेही स्पष्ट करण्यात आलं आहे.

आपल्या विविध 'प्रतापां'नी चर्चेत आलेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर या सध्या गायब असल्याचे समोर आले आहे. खेडकर यांना अपंग आणि ओबीसी नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट मिळालंच कसं? या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनीच केली होती. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या खेडकर यांच्या बाबतीत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आलेल्या आहेत. त्यांच्या कुटुंबाने केलेले 'उद्योग ' देखील समोर आलेले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT