MPSC Exam News: राज्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) गट-क सेवामधील लिपिक-टंकलेखक आणि कर सहाय्यक पदांसाठी घेतली जाणारी स्वतंत्र टायपिंग टेस्ट अखेर रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अतिरिक्त ताण कमी होणार आहे.
यापूर्वी विद्यार्थ्यांकडे शासनमान्य GCC टंकलेखन प्रमाणपत्र असतानाही मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर आयोगाकडून पुन्हा टायपिंग टेस्ट घेतली जात होती. या प्रक्रियेमुळे निकाल लागायला खूप उशीर होत होता. अनेक विद्यार्थ्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती. अखेर आयोगाने विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
आयोगाचे सचिव महेंद्र हरपालकर यांनी २० मे २०२६ रोजी यासंदर्भातील अधिकृत परिपत्रक जारी केले. आयोगाच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली असून नवीन नियम तात्काळ लागू करण्यात आले आहेत.
आता उमेदवारांची निवड केवळ पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा या दोन टप्प्यांतूनच होणार आहे. मुख्य परीक्षेतील गुणांच्या आधारे थेट गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे. त्यामुळे भरती प्रक्रिया अधिक वेगाने पूर्ण होण्याची शक्यता आहे.
मात्र, एक महत्त्वाची अट कायम ठेवण्यात आली आहे. विद्यार्थ्यांकडे शासनमान्य GCC टंकलेखन प्रमाणपत्र असणे अजूनही अनिवार्य राहणार आहे. आयोगाकडून स्वतंत्र टायपिंग टेस्ट घेतली जाणार नाही, पण नियुक्तीवेळी प्रमाणपत्रांची पडताळणी केली जाणार आहे.
या निर्णयामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि जलद होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
MPSC ने लिपिक-कर सहाय्यक पदांची टायपिंग टेस्ट रद्द केली.
आता निवड फक्त पूर्व आणि मुख्य परीक्षेवर होणार.
विद्यार्थ्यांचा दुहेरी परीक्षेचा ताण कमी झाला.
GCC टंकलेखन प्रमाणपत्र मात्र अनिवार्य राहणार.
भरती प्रक्रिया आता अधिक जलद होण्याची शक्यता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.