MPSC Exam  Sarkarnama
प्रशासन

MPSC News: महिला उमेदवारांना एमपीएससीचा मोठा दिलासा; शारीरिक चाचणी पुढे ढकलली

PSI Exam: लोकसभा निवडणुकीमुळे पोलिसांसह सरकारी कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे कामकाज दिले जाते. याची माहिती असतानाही एमपीएससीने कोणतेही नियोजन न करता सरसकट तारीख जाहीर करुन ढिसाळ नियोजनाचे प्रदर्शन केल्याचा आरोप विद्यार्थ्यी करत आहेत.

सरकारनामा ब्यूरो

सम्राट कदम :

MPSC PSI News: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) पोलिस उपनिरीक्षक संवर्गासाठीची शारीरिक चाचणी अखेर पुढे ढकलली आहे. वाढचा उन्हाचा त्रास आणि अपुरा कालावधी तसेच महिला उमेदवारांच्या बदललेल्या निकषामुळे चाचणी पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीनंतर प्रशासकीय कारणास्तव शारीरिक चाचणी पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे महिला उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.

एमपीएससीकडून महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 या परीक्षेतीस पीएसआय (PSI) संवर्गाकरीता 15 एप्रिल 2024 ते 2 मे 2024 या कालावधीत शारीरिक चाचणी (Physical Test) आयोजित केली होती. परंतु लोकसभा निवडणुकीमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे एमपीएससीने पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. परंतु, यावेळीदेखील एमपीएससीने शारीरिक चाचणी कधी घेतली जाणार याबाबतची तारीख जाहीर केलेली नसून सुधारित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल, असं एमपीएससीने सांगितलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एमपीएससीने (MPSC) लोकसभा निवडणुकांमुळे (Lok Sabha Election) पीएसआयची शारीरिक चाचणीची परिक्षा 15 ते 27 एप्रिल या कालावधीत आयोजित केली होती. तसेच 19, 26 आणि 27 एप्रिल रोजी होणारी शारीरिक चाचणीची परिक्षा ही 29, 30 एप्रिल आणि 2 मे 2024 रोजी पोलीस मुख्यालय नवी मुंबई येथे होणार असल्याचे जाहीर केले होते.

त्यामुळे उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली होती. परंतु आता विशेष पोलीस उपमहानिरीक्षक यांनी मैदानी चाचणी घेणे शक्य नसल्याचे कारण देत ती पुढे ढकलण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीमुळे पोलिसांसह (Police) सरकारी कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे कामकाज दिले जाते. याची माहिती असतानाही एमपीएससीने कोणतेही नियोजन न करता सरसकट तारीख जाहीर करुन ढिसाळ नियोजनाचे प्रदर्शन केल्याचा आरोप विद्यार्थ्यी करत आहेत.

पीएसआयच्या (PSI) शारीरिक चाचणीच्या निकषांमध्ये 2021 मध्ये बदल करण्यात आला होता. उमेदवारांना तयारीसाठी एक वर्ष मिळाले असतानाही त्यावर्षी 112 जागांपैकी फक्त 64 मुली पात्र ठरल्या होत्या. तर आता फक्त एक महिन्याच मिळत आहे. 13 मार्चला मुख्य परीक्षेचा निकाल लागला आणि आता एका महिन्यात शारीरिक चाचणीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. शिवाय नवे निकष महिला उमेदवारांसाठी बदलले असून, इतर राज्यांच्या तुलनेत ते अवघड आहेत.

त्यामुळे कमी कालावीत आणि वाढत्या उन्हाळ्यात ही तयारी करणे अशक्य आहे. शिवाय मागील भरतीत महिला उमेदवारांचा भरतीत टक्का घसरला आहे. 2015 ते 2021 या कालावधीत एमपीएससीने कधीही उन्हाळ्यात अशा प्रकारची चाचणी घेतली नव्हती. परीक्षा सकाळची असली तरीही त्यासाठीचा सराव दररोज उन्हात करावा लागत असल्याचे उमेदवारांचे म्हणणे होते.

महिला उमेदवारांना मोठा दिलासा

मैदानी चाचणीमध्ये बदल झाल्याने महिला उमेदवार तणावाखाली होत्या. शिवाय केवळ या एका महिन्यात मैदानी चाचणी होणार होती, त्यामुळे आता ही चाचणी पुढे ढकलल्याने महिला उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे. एमपीएससीने विद्यार्थ्यांना परीक्षांची तयारी करण्यासाठी पुढे ढकलेल्या परीक्षांच्या तारखा लवकर जाहीर कराव्यात, अशी प्रतिक्रिया महेश बडे, प्रमुख स्टूडंट्स राईट्स असोसिएशन यांनी दिली आहे.

(Edited By Jagdish Patil)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT