Students preparing for the MPSC Prelims exam in Maharashtra amid heavy rains. The MPSC admit card and ID proof remain mandatory for entry. Sarkarnama
प्रशासन

MPSC Exam : MPSC राज्यसेवा परीक्षा घेण्यावर ठाम! अतिवृष्टीचा विद्यार्थ्यांना दिलासा नाहीच, आयोगाने थेट 'ते' परिपत्रकच जारी केलं

MPSC Prelims 2025 Update: महाराष्ट्रातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने 28 सप्टेंबरला राज्याच्या 36 जिल्हा केंद्रांवर घेतली जाणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विरोधी पक्षांतील अनेक नेत्यांसह पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.

Jagdish Patil

MPSC Prelims 2025 Update : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शिवाय अद्यापही अनेक गावांचा संपर्क तुटल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.

याच अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने 28 सप्टेंबरला राज्याच्या 36 जिल्हा केंद्रांवर घेतली जाणारी संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विरोधी पक्षांतील अनेक नेत्यांसह पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.

त्यामुळे आयोग याबाबत नेमका काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलं होतं. मात्र, आता नियोजित तारखेलाच म्हणजे 28 सप्टेंबरलाच राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. कारण एमपीएससीकडून आता एक परिपत्रक जाहीर केलं आहे.

ज्यामध्ये आयोगाने परीक्षा कक्षात येण्यापासून ते परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी दीड तास अगोदर हजर राहण्याबाबतच्या सूचना विद्यार्थ्यांसाठी दिल्या आहेत. त्यामुळे आता आयोग परीक्षा पुढे ढकलण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. आयोगाने परिपत्रकात उमेदवारांना परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन मुद्रित केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य असल्याचं सांगितलं आहे.

तसंच उमेदवारांनी परीक्षा उपकेंद्रावर परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी दीड तास अगोदर हजर राहणे अनिवार्य असून परीक्षा कक्षातील शेवटच्या प्रवेशासाठी प्रवेश प्रमाणपत्रावर विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही उमेदवारास प्रवेश दिला जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

तर ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड व स्मार्टकार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र सोबत असणं गजरेचं आहे. तसंच उमेदवाराचे पोफो आणि इतर मजकूर सुस्पष्टपणे दिसेल अशी मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत प्रत्येक पेपरच्यावेळी स्वतंत्र सादर करणे अनिवार्य असल्याचंही परिपत्रकात म्हटलं आहे.

त्यामुळे आता आयोगाने परीक्षेची सर्व तयारी केल्यामुळे परीक्षा पुढे ढकलणं जवळपास अशक्य मानलं जात आहे. दरम्यान, आधीच पावसाने झोडपलेल्या मराठवाड्याला पुढील पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

विदर्भातही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे आधीच्याच पावसामुळे परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांचे मोठे नुकसान झाले असून त्यांना अभ्यासाला वेळ मिळावा यासाठी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी अद्यापही विद्यार्थ्यांसह विरोधकांकडून केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT