Pune News, 26 Sep : सध्या प्रत्येक पुणेकराला घरातून बाहेर पडण्याआधी रस्त्यावर ट्रॅफिक किती असेल? हा प्रश्न सतावत असतो. कारण शहरातील वाहतूक कोंडी नित्याचीच बाब झाली आहे. याचा अनेकांना मानसिक आणि शारीरिक त्रास होत आहे.
तर शहरातील ट्रॅफिकपासून सुटका व्हावी यासाठी आता पुणे पोलिसांकडून शहरातील सुमारे 500 सिग्नल जंक्शनवर AI तंत्रज्ञानावर आधारित 'इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम' (ITMS) उभारण्यात येणार असून या नव्या सिस्टीमसाठी तब्बल 1100 कोटींचा खर्च होणार आहे.
ही नवी सिस्टीमचं काम पुढील 3 महिन्यांत सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, दुसरीकजे पुणे पोलिसांकडून ही नवीन AI तंत्रज्ञानावर आधारित 'इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम' आणली जात असताना सध्या पुण्यात स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या अडॅप्टिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (ATMS) सिग्नल यंत्रणेसाठी महापालिकेने 102 कोटी खर्च करून 125 सिग्नल्स बसवले होते.
मात्र, त्यामुळे शहरातील ट्रफिक कमी न झाल्यामुळे ही यंत्रणा अपयशी ठरली. त्यामुळे आता पोलिस आयुक्तालयाकडून 'आयटीएमएस' सिग्नल यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 'आयटीएमएस' हा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून याबाबतचा प्रस्ताव पोलीस आयुक्तालयाकडून राज्य सरकारला पाठवलेला प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्यामुळे येत्या काही महिन्यांत हा प्रकल्प सुरू होऊ शकतो.
'इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम' ही सिग्नल यंत्रणा गाड्यांचा वेग, त्यांची संख्या तसंच प्रवासाचा वेळ आणि पीक अवर मधील ट्रॅफिकचा अभ्यास करून ऑटोमॅटीक सिग्नल सेट करते. 'एआय'च्या साहाय्याने सिग्नल सिंक्रोनायझेशन साधले जाते. त्यामुळे अनावश्यक वाहनांची गर्दी होत नाही आणि वाहतूक सुरळीतपणे सूरू राहते.
या सिस्टीममुळे शहरात नेत्यांचे दौरे असतात त्यावेळी वाहतूक कोंडी होऊन नागरिकांची गैरसोय टाळली जाईल आणि रुग्णवाहिकेसाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्याचे काम या तंत्रज्ञानाच्या मदतीने करता येऊ शकते, असं सांगितलं जात आहे.
तर पुण्यातील वाढती वाहनसंख्या लक्षात घेता पारंपरिक सिग्नल प्रणाली अपुरी पडत असून आयटीएमएस या नव्या प्रणालीमुळे चौकांमध्ये सिग्नल स्वयंचलितपणे वाहतुकीच्या प्रमाणानुसार नियंत्रित होतील. ग्रीन कॉरिडॉरची सुविधा व्हीआयपी मूव्हमेंट आणि रुग्णवाहिका सेवेसाठी उपयुक्त ठरेल.
या प्रकल्पाची अंमलबजावणी तीन महिन्यांत सुरू होणे अपेक्षित आहे. वाहतूक कोंडी कमी झाल्यास नागरिकांचा प्रवासाचा वेळ वाचणार असल्याचं पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता नव्या सिस्टीमुळे तरी पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.