electricity bill  Sarkarnama
प्रशासन

MSEB action mode: महावितरण देणार सरकारलाच 'शॉक'; पाणीपुरवठा, आरोग्य खाते टार्गेटवर, बजावली नोटीस

Government offices electricity bill : महावितरणकडून शासकीय कार्यालयांना बिल भरण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. महावितरणने देखील थकीत बिलांची रक्कम वसुली करण्यासाठी मोहीम तीव्र केली आहे.

Sachin Waghmare

Buldhana News : महावितरणकडून विज बिल वसुलीसाठी मोहीम राबवण्यात येत आहे. आर्थिक वर्ष संपत आल्याने थकीत वीज बिल वसुलीसाठी वीज वितरण विभाग ॲक्शन मोडवर आला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांकडे मोठ्या प्रमाणात बिलांची रक्कम थकली आहे. जिल्ह्यातील विविध विभागाकडे जवळपास दीड कोटी रुपये थकले आहेत. ही वसुली करण्यासाठी महावितरणकडून शासकीय कार्यालयांना बिल भरण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. महावितरणने देखील थकीत बिलांची रक्कम वसुली करण्यासाठी मोहीम तीव्र केली आहे.

बुलढाणा जिल्ह्यात एकूण सर्व प्रकारचे 5 लाख ग्राहक आहेत. त्यांच्याकडे 118 कोटी रुपये चालू थकबाकी आहे. तर 1524 शासकीय कार्यालयांकडे 1 कोटी 67 लाख रुपयांचे वीजबिल थकले आहे. ज्यामध्ये विहित मुदतीत विज बिल न भरल्यास विद्युत पुरवठा खंडित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. दरम्यान शासकीय कार्यालयांकडून देखील मोठ्या प्रमाणात वीज बिलाचा भरणा करण्यास विलंब करण्यात येत असल्याने थकीत बिलांची रक्कम वाढली आहे.

पाणीपुरवठा, आरोग्य विभागाकडे सर्वाधिक रक्कम थकली

बुलढाणा जिल्ह्यात एकूण सर्व प्रकारचे 5 लाख ग्राहक आहेत. त्यांच्याकडे 118 कोटी रुपये चालू थकबाकी आहे. तर 1524 शासकीय कार्यालयांकडे (Govt.Office) 1 कोटी 67 लाख रुपयांचे वीजबिल थकले आहे. ज्यामध्ये ग्रामीण पाणीपुरवठा आणि आरोग्य विभागाकडे सर्वाधिक वीजबिल थकबाकी असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.

बुलढाणा जिल्ह्यात चालू बिलांची थकीत रक्कम जवळपास 118 कोटी रुपयांवर आहे. यातील शासकीय कार्यालयांची एकूण थकबाकी ही 1 कोटी 67 लाख रुपये आहे. तर मागील जुन्या थकबाकीची रक्कम ही 900 ते एक हजार कोटीच्या घरात पोहचली आहे.

बड्या थकबाकीदारांवर नजर

यामुळे मार्च एंडिंगपर्यंत थकीत बिलांची वसुली करण्यासाठी महावितरणने मोहीम तीव्र केली आहे. येत्या काळात बड्या थकबाकीदारांवर नजर असून मुदतीत रक्कम न भरल्यास वीज पुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचा इशारा महावितरणने दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT