Shivsena : 'मातोश्री'वर लिंबू अन् काळी जादू; फडणवीस 'वर्षा'वर का राहत नाहीत? राऊतांचा राणेंना सवाल

ShivSenaUBT Party MP Sanjay Raut BJP Minister Nitesh Rane Black Magic Matoshree Mumbai : मंत्री नीतेश राणे यांनी 'मातोश्री'वर लिंबू कापले अन् काळी जादू केली जात असल्याच्या टीकेला खासदार संजय राऊत यांचे जोरदार प्रत्युत्तर.
Shivsena
ShivsenaSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : भाजप मंत्री नीतेश राणे यांनी मुख्यमंत्रीपद मिळाले नाही म्हणून, 'मातोश्री'वर लिंबू कापले जात आहेत, काळी जादू केली जात आहे, उपास-तपास केले जात आहे. अनेक साधू-संतांना भेटले जात आहे, असा आरोप केला.

त्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी जशास-तसे प्रत्युत्तर दिले आहे. "मला एक प्रश्न आहे. 'वर्षा' बंगल्यावर देवेंद्र फडणवीस राहायला का जात नाही? याचं उत्तर या काळ्या जादूवाल्यानं द्याव. माझ्या नादाला लागू नका",असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

भाजप (BJP) मंत्री राणे यांनी 'मातोश्री'वर काळी जादू करत असल्याचा गंभीर आरोप केला होता. खासदार संजय राऊत यांनी त्या आरोपाचा त्यांच्या खास शैलीत समाचार घेतला. 'माझ्या नादाला लागू नका', असा इशारा यावेळी राऊतांना दिला.

Shivsena
Sanjay Raut : एकनाथ शिंदे शून्यात अन् गुंगीत; शिवसेनेतील 25 आमदारांवर फडणवीसांचे नियंत्रण; संजय राऊत यांचा दावा

संजय राऊत म्हणाले, "मला एक प्रश्न आहे. 'वर्षा' बंगल्यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) राहायला का जात नाही? काळी जादू, काळी जादू म्हणत आहात ना, देवेंद्र फडणवीस आजही मुख्यमंत्र्यांच्या विकृत निवासस्थानी राहायला का जात नाही? याचं उत्तर या काळ्या जादूवाल्यानं द्याव. माझ्या नादाला लागू नका".

Shivsena
Dinvishesh 2 February : काय घडलं होतं त्या वर्षी आजच्या दिवशी वाचा आजचे दिनविशेष

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी दोन्ही शिवसेना एकत्र यावं, असे विधान केले. त्यावर संजय राऊत यांनी संजय शिरसाट म्हणजे अटलबिहारीच आहेत. महान माणूस आहे. ते करू शकतात. त्यांच्या भावनाविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. ते काहीही करू शकतात. शरद पवार अन् अजित पवार यांना एकत्र आणू शकतात. चांगली गोष्ट आहे. त्यांच्याविषयी आभारी आहे, अशी प्रतिक्रिया दिली.

CM अन् दोन्ही DCM यांना बजेट कळचं नाही

संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना बजेट कळालेलं नाही. बजेट कळून घेण्यासाठी किमान 72 तास जावे लागतात. देशाचे बजेट नुसते आकडे अन् घोषणांवर चालत नाही. आम्हाला बजेट समजावून घेण्यासाठी नानी पालखवाल यांचे भाषण ऐकायला जावं लागत होते. हे चिंतामणराव देशमुख, रघुराम राजन आहेत का, दोन तासात बजेट समजायला?', असा टोला लगावला.

बजेट म्हणजे मध्यमवर्गींना मधाचे बोट

मध्यमवर्गींना खूश करणारे बजेट आहे. परंतु विधानसभेच्या निवडणुकीत मध्यमवर्गींची मते भाजपला पडलेली नाहीत. 'ईव्हीएम'च्या माध्यमातून मते चोरली. मध्यमवर्गीय अजून धक्क्यात आहे. त्यांना मधाचे बोट लावण्याचा प्रयत्न आहे. बजेटमधून लोकांना नेमकं काय मिळाले, हे शोधावं लागेल. अजून तरी थोडा वेळ जाऊ द्यावा लागणार आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

मोदींचे बजेट म्हणजे, निवडणुकांची गोळाबेरीज

महाराष्ट्राला काय मिळाले आहे, यावर बोलताना संजय राऊत यांनी मोदींचे प्रत्येक बजेट राज्यांच्या आणि लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलं जाते. भविष्यात बिहारच्या निवडणुका आहेत, तिथं बिहारवर अक्षरशं वर्षांव, जिथं भाजपचे राज्य नाही, म्हणजे तामिळनाडू, केरळ, कर्नाटक किंवा महाराष्ट्र असेल, तिथं तोंडाला पान पुसायची आणि पुढं जायचं. भाजपचे लोकं आहे, ते अंधभक्त आहेत, ते टाळ्या वाजवत बसतात, असा टोला लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com