MSRTC ST Bus sarkarnama
प्रशासन

MSRTC recruitment : तरुणांनो, 'एसटी'त नोकरीसाठी प्रयत्न करत असाल सावधान! मंत्र्यांनीच दिली महत्वाची माहिती...

MSRTC jobs, ST driver jobs, MSRTC vacancy, Pratap Sarnaik : एसटी महामंडळाच्या नावाखाली सुरू असलेल्या अशा बेकायदेशीर प्रकारांची सुरक्षा व दक्षता विभागामार्फत सखोल चौकशी करण्याचे आदेश मंत्री सरनाईक यांनी दिले आहेत.

Rajanand More

Maharashtra ST recruitment update : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) पुढील काही दिवसांत सुमारे १३ हजार ९८० चालक व यांत्रिकी कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरती केली जाणार आहे. मात्र, एसटी महामंडळाच्या नावाचा गैरवापर करून काही खासगी संस्थांकडून नोकरीचे अमिष दाखवत पैसे उकळले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी संबंधित संस्थांची चौकशी करून कारवाईचे आदेश दिले आहेत. भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि नियमानुसार पार पडावी, बाह्य संस्थेमार्फत करण्यात येणारी उमेदवारांची निवड एसटी महामंडळाने निर्धारित केलेल्या पात्रता निकषांनुसारच व्हावी, असे निर्देश सरनाईक यांनी दिले आहेत.

महामंडळाच्या नावाचा गैरवापर करून काही खासगी संस्था गरजू व बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवत त्यांच्याकडून अवैधरित्या पैसे उकळत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त होत आहेत, अशी माहिती सरनाईक यांनी दिली आहे.

या पार्श्वभूमीवर, एसटी महामंडळाच्या नावाखाली सुरू असलेल्या अशा बेकायदेशीर प्रकारांची सुरक्षा व दक्षता विभागामार्फत सखोल चौकशी करण्याचे आदेश मंत्री सरनाईक यांनी दिले आहेत.

उमेदवारांची फसवणूक करणाऱ्या संस्था व संबंधित व्यक्तींवर तातडीने गुन्हे दाखल करावेत, असे निर्देशही मंत्री सरनाईक यांनी दिले आहेत. भरती प्रक्रियेच्या नावाखाली बेरोजगार तरुणांची आर्थिक लूट करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT