Maharashtra Clerk Exam Cancelled : सरकारी नोकरीच्या आशेने दिवसरात्र अभ्यास करणाऱ्या राज्यातील तरुणांसमोर सध्या एक वेगळेच संकट उभे राहिले आहे. परीक्षा पार पडते आणि निकालाची प्रतीक्षा असतानाच परीक्षेतील गैरप्रकार किंवा तांत्रिक त्रुटी समोर आल्याने संपूर्ण परीक्षा किंवा भरती प्रक्रिया रद्द करण्याची वेळ येत आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) औषध निरीक्षक गट-ब पदासाठीची भरती प्रक्रिया रद्द केली होती. या परीक्षेमध्ये गैरव्यवहार झाल्याचं समोर आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता मुंबई उच्च न्यायालयाने लिपिक पदाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. लिपिक परीक्षेतील तांत्रिक घोळामुळे राज्यभरात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते.
त्यानंतर आता परीक्षा रद्द करत उच्च न्यायालयाने राज्यातील हजारो उमेदवारांना मोठा दिला आहे. भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि उच्च दर्जाचे निकष कायम ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवरील लिपिक पदाची १६ ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या टायपिंग परीक्षेदरम्यान राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर तांत्रिक समस्या निर्माण झाल्याच्या तक्रारी उमेदवारांनी केल्या होत्या. काही केंद्रांवर सर्व्हरची समस्या, हार्डवेअर बिघाड, की-बोर्ड व्यवस्थित काम न करणे, सॉफ्टवेअर संथ होणे आणि परीक्षा सुरू असतानाच उमेदवार लॉगआऊट होणे अशा अडचणींच्या तक्रारी समोर आल्या.
काही ठिकाणी उमेदवारांच्या परीक्षा सुरू होण्याच्या वेळेतही फरक पडल्याचे सांगण्यात आले. या प्रकारामुळे उमेदवारांच्या टायपिंगच्या वेगावर थेट परिणाम झाल्याचा आरोप करण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाच्या या भरती प्रक्रियेत १,३६२ लिपिक पदांचा समावेश आहे आणि सुमारे १३ हजार उमेदवार टायपिंग परीक्षेसाठी पात्र ठरले होते.
या प्रकारानंतर विविध केंद्रांवर उमेदवारांनी आंदोलन केले. परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी जोर धरू लागली. अखेर मुंबई उच्च न्यायालयाने लिपिक पदाची टायपिंग परीक्षा रद्द करून नव्याने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या परीक्षेची तारीख आणि केंद्रांची माहिती अद्याप जाहीर झालेली नाही. नवी टायपिंग परीक्षा कधी आणि कुठे होणार, याबाबतची सविस्तर माहिती आणि वेळापत्रक लवकरच मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाईल, असंही प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.