Nagpur Government Medical College Sarkarnama
प्रशासन

Nagpur: नोकरीची संधी...! शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 680 पदांची भरती

Nagpur Government Medical College : दहावी उत्तीर्ण उमेदवारांना अर्ज करता येणार

Anand Surwase

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरी प्राप्त करण्याची सुवर्णसंधी आहे. नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गट ड पदाची भरती केली जाणार आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यासंबंधीची सविस्तर माहिती जाणून घ्या...

राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या वतीने सातत्याने विविध पदांची भरती केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर नागपुरातील शासकीय महाविद्यालयाच्या वतीने तब्बल 680 पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही भरती गट ड च्या पदांसाठी केली जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर (https://gmcnagpur.org/) ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.

शासकीय महाविद्यालयाच्या वतीने करण्यात येणाऱ्या या भरतीसाठी इच्छुक उमेदवारासाठी वयाची अट ही 30 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे इतकी ठेवण्यात आली आहे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयामध्ये 05 वर्षे जास्तीची सूट देण्यात आली आहे. इतर मागासवर्गीयांसाठी 3 वर्षांची अधिकची सूट देण्यात आली आहे. तसेच या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडून भरतीचे शुल्क आकारले जाणार आहे. यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला 1000 रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांना 900 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

या भरतीसाठी उमेदवारांनी महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर (https://gmcnagpur.org/) ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. अर्ज सादर करताना उमेदवाराने आपली माहिती अचूक भरणे आवश्यक आहे. चुकीची माहिती भरल्यास उमेदवारांचे अर्ज बाद ठरवण्यात येतील. तसेच अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत 30 जानेवारी 2024 पर्यंत आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांची 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेसाठी उमेदवारांना 2 तासांचा वेळ दिला जाणार आहे. या भरतीच्या आरक्षित जागा, निवड प्रक्रिया यासह इतर बाबींची सविस्तर माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी पुढील जाहिरातीच्या लिंकवर भेट द्यावी -

https://drive.google.com/file/d/1ato5Auj6UvP7VGNiuSBaLDGfDvtsrnhq/view

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT