Pune News: शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज आहे. आता शिक्षकेतर पदभरती करण्याचा मार्ग राज्य सरकारने मोकळा केला आहे. अनेक दिवसांपासून अनुशेषाच्या नावाखाली ही पदभरती थांबवली होती.
राज्य सरकारने सुधारित आकृतीबंध लागू केला आहे. गेल्या तब्बल २१ वर्षांपासून राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पदभरती रखडलेली होती. शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयाचे राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनांकडून स्वागत होत आहे.
या सुधारित आकृतीबंध लागू केल्यामुळे त्याचा फायदा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसोबत शिक्षकांनाही होणार आहे. कारण शिक्षकेत्तर पदे रिक्त राहिल्यास त्यांची कामे शिक्षकांनाच करावी लागतात, या पदभरतीमुळे शिक्षकांना त्यांच्या अध्यापनावर लक्ष केंद्रीत करता येणार आहे. या भरती प्रक्रियेसंदर्भातील अध्यादेश शालेय शिक्षण विभागाने नुकताच काढला आहे.
‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी २०२२’ मधील गुणांच्या आधारे शिक्षक पद भरतीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. दुसऱ्या टप्पा सुरु झाला आहे. या दुसऱ्या टप्प्यात पदभरतीसाठी एकूण रिक्त पदांच्या ८० टक्के पदे भरण्यात सरकारने परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे १०० टक्के सरळसेवेने पदे भरण्याची मान्यता शालेय शिक्षण विभागाने दिली आहे.
शिक्षकेतर पदांनाही एकूण रिक्त पदांच्या ८० टक्के पदभरतीची अट लागू केली आहे.शालेय शिक्षण विभागाने मान्यताप्राप्त खासगी अंशतः, पूर्णतः अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आकृतिबंध लागू केला आहे. विद्यार्थी पटसंख्येच्या आधारे शिक्षकेतर संवर्गातील कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, मुख्य लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल प्रयोगशाळा सहायक ही नियमित पदे मंजूर केली आहेत.
शिक्षकेत्तर पदे रिक्त राहिल्यास त्यांची कामे शिक्षकांनाच करावी लागतात, ही वस्तुस्थिती असल्याचे शालेय शिक्षण विभागाने अखेर मान्य केले. प्रशासकीय पत्र व्यवहार, अभिलेखाचे जतन, ग्रंथालयाचे व्यवस्थापन, प्रयोगशाळेतील सामान्य स्वरूपाची कामे, देखील शिक्षकांना करावी लागतात. परिणामी त्याचा अध्यापनावर आणि पर्यायाने शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होतो, हे लक्षात घेऊन अखेर राज्य सरकारने शिक्षकेत्तर पदांच्या भरती प्रक्रियेला ग्रीन सिग्नल दिला आहे.
अनुशेष नोंदवही तपासा-विभागीय आयुक्तांच्या सूचना चतुर्थश्रेणी कर्मचारी पद रद्द करून त्याऐवजी शिपाई भत्ता लागू केला आहे. मात्र, नियमित नियुक्तीने कार्यरत असलेले चतुर्थश्रेणी शिक्षकेतर कर्मचारी सेवानिवृत्तीपर्यंत कार्यरत राहणार आहेत. अनेक दिवसांपासून अनुशेषाच्या नावाखाली ही पदभरती थांबवली होती.
आता शिक्षकेत्तर पदभरती करण्याचा मार्ग राज्य सरकारने मोकळा केला आहे. या निर्णयानुसार सर्व विभागीय आयुक्तांनी अनुशेष नोंदवही तपासून देण्याबाबत स्पष्ट सूचना दिली असून अनुशेष तपासणी करून पद भरती करण्यास मान्यता दिली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर महामंडळाचे सरकार्यवाह शिवाजी खांडेकर यांनी 'सरकारनामा'शी बोलताना दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.