Pune News: पुण्यातील दीनानाथ रुग्णालयाने उपचारासाठी आधी दहा लाख रुपये भरण्याची अट घातल्यामुळे गर्भवती तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. तनिषा भिसे यांच्या मृत्यूस दीनानाथ रुग्णालयास जबाबदार असल्याचा आरोप भिसे कुटुबियांनी केला आहे.
रुग्णालयाने वेळेवर उपचार दिले नाहीत, या प्रकरणामुळे आता दोन्ही शिवसेना गट आक्रमक झाले आहेत. रुग्णालयाच्या बाहेर शिवसैनिकांनी आंदोलन सुरु केले आहे. संतप्त शिवसैनिकांनी डॅाक्टरांच्या अंगावर चिल्लर फेकत या घटनेचा निषेध केला आहे. पोलिसांना शिवसैनिकांना रुग्णायलाच्या गेटवर रोखलं आहे. आंदोलक आक्रमक झाले असून रुग्णालयाबाहेर राडा सुरु आहे.
आक्रमक शिवसैनिकांनी रुग्णालयाच्या नामफलकाला काळे फासले. विविध पक्ष आणि संघटनाचे कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध केला आहे. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनीही एक्स अकाऊंटवरुन या रुग्णालयासंदर्भातील एक आर्थिक व्यवहाराचा उल्लेख करत पोस्ट केली आहे.आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी 'दीनानाथ'च्या चौकशीसाठीचे आदेश दिले आहे.
हॉस्पिटलचे ऑडिट करण्यासाठी नेमलेल्या समितीसाठी पाच प्रशासकीय कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. रुग्णालयाचे याबाबतचा अहवाल सादर करावा, अशा सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जाऊन समितीचे सदस्य आणि अध्यक्ष चौकशी करणार आहेत.
तनिषा भिसे या भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पती होत्या. पैशाअभावी रुग्णालयाने उपचार केल्याने तनिषा यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप आमदार अमित गोरखे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. विजय कुंभार यांनीही एक्स अकाऊंटवरुन पोस्ट करीत रुग्णालयावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळाने रुग्णालयासाठी सवलत दिल्याची माहिती दिली आहे.
"आत्ता आत्ता म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये राज्य शासनाने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पुण्यातील जवळपास आठ हजार चौरस फुट जागा वार्षिक नाममात्र एक रुपया भाड्याने दिली आहे. यापूर्वी रुग्णालयासाठी दिलेली जमीन ही अशीच नामामात्र भाड्याने दिलेली आहे. आत्ता दिलेल्या जमिनीची किंमत सध्याच्या बाजार भावाने कमीत कमी 10 कोटी रूपये तरी असेल. रुग्णालयांने मात्र 10 लाख रूपये आगाऊ भरले नाहीत म्हणून उपचार नाकारले आणि रूग्ण दगावला. काय अर्थ लावायचा या सगळ्यांचा?" असा सवाल कुंभार यांनी आपल्या पोस्टमध्ये विचारला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.