Palghar Crime Sarkarnama
प्रशासन

Palghar illegal moneylending : बेकायदा सावकारीच्या गोपनीय तक्रारी, पडताळणी अन् सहाय्यक निबंधकांचे छापे...

FIR Registered Against 3 for Illegal Money Lending in Palghar After Registrar Office Raids : पालघर जिल्ह्यात बेकायदा सावकारी करणाऱ्यांविरोधात माहिती गोळा करत सहाय्यक निबंधक कार्यालयाने छापे घातले.

Pradeep Pendhare

Maharashtra illegal money lending crackdown : मुंबईच्या पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील बेकायदा सावकारी व्यवसाय करणाऱ्यांना जिल्हा प्रशासनानं दणका दिला.

पालघरच्या सहाय्यक निबंधक कार्यालयामार्फत कारवाईचा बडगा उगारत बोईसर शहरातील भीमनगर येथील सावकार सागर करनकाळे, कपिल करनकाळे आणि उमरोळी गावातील अमोल नारखेडे या तिघांविरुद्ध कारवाई करण्यात आली. बेकायदा सावकारी व्यवसाय केल्याप्रकरणी गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

सागर करनकाळे, कपिल करनकाळे आणि अमोल नारखेडे या तिघांविरोधात अवैध सावकारी व्यवसाय करून गरजू लोकांच्या अडचणीचा फायदा, लुबाडणूक आणि पिळवणूक केली जात असल्याची तक्रार सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयास करण्यात आली होती. त्या तक्रारीनुसार निबंधक कार्यालयाला तिघेही बेकायदेशीर सावकारी करीत असल्याचे आढळून आले.

सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयातील सहकार अधिकारी विठ्ठल आवुलवार यांनी पोलिस (Police) बंदोबस्तात अमोल, सागर आणि कपिल या तिघांच्या घरांवर छापे घालत झडती घेतली. त्यात तिघांनीही कर्जदारांविरोधात शारीरिक इजा, दहशत, धमकी, मानसिक दबाब आणि छळ करून महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियमाच्या विविध कलमांचे उल्लंघन केल्याचे आढळले.

विठ्ठल आवुलवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बेकायदा खासगी सावकारी व्यवसाय करणाऱ्या अमोल नारखेडे, सागर करनकाळे आणि कपिल करनकाळे या तिघांविरोधात पालघर आणि बोईसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पालघर तालुक्यात कुणी बेकायदेशीर सावकारी करत असल्याचा त्याची माहिती सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे द्यावी. तक्रार करणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवली जातील, असे सहाय्यक निबंधक अजय गुजराथी यांनी सांगितले. पालघर हा काहीसा आदिवासी भाग आहे. इथं मोलमजुरी करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. पालघर तालुक्यात वारळी, कातकरी, मल्हार कोळी इत्यादी आदिवासी जमाती मोठ्या प्रमाणात आहेत. त्याचाच काही जण फायदा घेऊन खासगी सावकारकी करतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT