Mumbai Police Intelligence : मुंबई मैं अब चप्पे-चप्पे पर रहेंगी 'इंटेलिजन्स'; महायुती सरकारकडून सहपोलिस आयुक्त पदाची नव्यानं निर्मिती

CM Devendra Fadnavis Mahayuti Government Creates Additional Police Commissioner Post for Mumbai Intelligence Unit : मुंबईचे विशेष पोलिस आयुक्त या पदाची श्रेणी कमी करून गृह विभागाने त्याऐवजी सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता असे नवे पद निर्माण केले.
Mumbai Police
Mumbai PoliceSarkarnama
Published on
Updated on

Mahayuti government decision : मुंबईचे विशेष पोलिस आयुक्त या पदाची श्रेणी कमी करून गृह विभागाने त्याऐवजी सहपोलिस आयुक्त (गुप्तवार्ता) असे नवे पद निर्माण केले.

यासंदर्भात शुक्रवारी आदेश जारी करण्यात आला. मुंबई पोलिस दलातील हे सहावे सहआयुक्तपद असणार आहे.

देवेन भारती यांची आयुक्तपदी नियुक्ती झाल्याने विशेष पोलिस (Police) आयुक्तपद रिक्त झाले होते. आता या नव्या पदाच्या निर्मितीमुळे विशेष आयुक्तपद आपोआप रद्द झाले. या नव्या पदावर कोणाची वर्णी लागते, या पदाच्या अधिपत्याखालील विभागाची रचना कशी असेल, त्यासाठी कोणते संरचनात्मक बदल होतील, याबाबत मुंबई पोलिस दलात चर्चांना उधाण आले आहे.

Mumbai Police
Ahilaynagar Bank recruitment scam : जिल्हा बँक भरती घोटाळा; भाजप आमदार कर्डिलेसह संचालकांना न्यायालयाचा दणका

मुंबई (Mumbai) शहर, संवेदनशील आस्थापना, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून गोपनीय माहिती मिळवणे आणि त्या माहितीचे सूक्ष्म पर्यवेक्षण करणे, या हेतूने या पदाच्या निर्मितीबाबत सरकार विचाराधीन होते. त्यासाठी विशेष आयुक्तपदाची अतिरिक्त महासंचालक ही श्रेणी विशेष पोलिस महानिरीक्षक, अशी अवनत करण्यात आली आणि या पदाचे सहआयुक्त (गुप्तवार्ता) असे नामकरण केल्याचे या आदेशात नमूद केले आहे.

Mumbai Police
Kirit Somaiya : मुंबई 'भोंगेमुक्त' करणार; किरीट सोमय्यांचं पुढचं अभियान ठरलं...

मुंबई भेटीवर येणाऱ्या देशातील, परदेशांतील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची प्रवास आणि वास्तव्यादरम्यान सुरक्षा व्यवस्था बळकट ठेवणे, त्यादृष्टीने गोपनीय माहिती निरंतर प्राप्त करणे आणि त्या अनुषंगाने होणाऱ्या हालचालींवर करडी नजर ठेवणे, ही नव्या सहआयुक्तपदाची प्रमुख जबाबदारी असेल, असे गृह विभागाने स्पष्ट केले.

कोणाची वर्णी लागणार, चर्चांना उधाण!

नव्याने निर्माण करण्यात आलेल्या सहपोलिस आयुक्त (गुप्तवार्ता) या पदासाठी राज्य पोलिस दलात महानिरीक्षक श्रेणीतील महिला अधिकाऱ्याचे नाव चर्चेत आहे. या विभागासाठी शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्यातील दहशतवाद विरोधी कक्ष (ATS), विशेष शाखेतील काही कार्यालये, सुरक्षा व संरक्षण विभागातील काही मनुष्यबळ जोडले जाईल, असेही समजते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com