Kavita Navande Bribery Case Sarkarnama
प्रशासन

Kavita Navande Bribe Case : वादग्रस्त कविता नावंदेला सहकाऱ्यासह लाच स्वीकारताना अटक

Kavita Navande News Update : वादग्रस्त जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांना लाचलुचपत विभागाच्या परभणी पथकाने अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारताना पकडले.

Pradeep Pendhare

Anti-Corruption Bureau Arrest: वादग्रस्त क्रीडा अधिकारी कविता नावंदे लाचलुचपत विभागाच्या परभणीतील पथकाने अडीच लाख रुपयांच्या लाच मागितल्याप्रकरणी पकडले. गेल्या आठ वर्षांपासून कविता नावंदे यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली असून, यात एकदा त्यांच्यावर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली होती.

परभणीतील मानवत इथल्या एका तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई झाली. क्रीडा स्पर्धेचे बिल तसेच स्वीमिंग पूलची मान्यता मिळावी, यासाठी तक्रारादाराने प्रस्ताव दिला होता. हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी कविता नावंदे यांना अडीच लाख रुपयांची लाच मागितील होती. यातील एक लाख रुपये अगोदरच स्वीकारले होते. उर्वरीत रक्कम स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या (Anti Corruption Bureau) परभणी पथकाने पकडले.

लाचलुचपत विभागाच्या पथकाने क्रीडा (Sport) अधिकाऱ्यावर अलीकडच्या काळात झालेली ही सर्वात मोठी कारवाई असल्याने खळबळ उडाली आहे. डिसेंबरमध्ये परभणी शहरातील विभागीय क्रीडा संकुलात 21 कोटींचा घोटाळा उघडकीस आला होता.

या घोटाळ्याच्या मास्टरमाईंडने विमानतळासमोरील अलिशान सोसायटीत दीड कोटींचा फ्लॅट खरेदी केला होता. त्याच्या समोरील इमारतीतच नावंदे यांचा फ्लॅट आहे. परभणीत त्यांना अटक होताच एसीबीच्या दुसऱ्या पथकाने त्यांच्या या फ्लॅटमध्ये छापा घालून संपत्तीची मोजदाद सुरू केली होती.

अहिल्यानगरमध्ये घेतले होते वादग्रस्त निर्णय

नावंदे 2022-2021 मध्ये शहरातील विभागीय क्रीडा संकुलात जिल्हा क्रीडा अधिकारी होत्या. व्यायामशाळा साहित्य व क्रीडांगण विकास अनुदान वाटप अनियमिततेप्रकरणी त्यांना निलंबित करण्यात आले. तसेच चार वर्षांपूर्वी निवृत्त क्रीडा अधिकाऱ्याला विनामोबदला सेवेत सामावून घेतल्याप्रकरणी क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरीया यांनी त्यांना नोटीस बजावली होती.

कविता नावंदेंविरुद्ध श्रीगोंद्यात दाखल आहे गुन्हा

अहिल्यानगर 2019मध्ये कार्यरत असताना त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. तसेच अहिल्यानगरमध्ये कोरोना काळात जून 2020 मध्ये विनापरवाना प्रवास केल्याप्रकरणी त्यांच्यावर बेलवंडी (ता. श्रीगोंदा) ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

याशिवाय कविता नावंदे यांनी पदभार स्वीकारताच वाडिया पार्क मैदानावर मोठे बदल केल्याने वाद ओढावून घेतला होता. प्रवेश शुल्क लावताना, आयाराम-गयाराम यांना प्रवेश बंद केला होता.

राज्य सरकारच्या तीन समित्यांकडून चौकशी

वाडिया पार्क मैदानात क्रीडा प्रशिक्षण देणाऱ्या अ‍ॅकॅडमींना शुल्क लावले होते. तसेच मैदानासाठी शुल्क वाढ केली होती. क्रीडा शिक्षकांवर आणि तालुका क्रीडा समित्यांवर पावसाळी शालेय क्रीडा स्पर्धांसंदर्भात वारंवार नवीन नियम तयार केले.

यातून क्रीडा संघटनांनी असहकार आंदोलन पुकारले. या आंदोलनाची राज्यभर चर्चा झाली. यानंतर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही असहकाराचा पवित्रा घेतला होता. यातून राज्य सरकारने नावंदे यांची तीन वेळा चौकशी केली. तशा समितीच्या पाठवल्या होत्या. यानंतर नावंदे यांची अहिल्यानगरमधून बदली झाली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT