Police Bharati 
प्रशासन

Police Bharati: चार वर्षांपूर्वीच वयोमर्यादा ओलांडलेले उमेदवार पोलीस भरतीसाठी पात्र; शासनानं काढला सुधारित जीआर

Police Bharati Revised GR 2025: यामुळं राज्यातील लाखो उमेदवारांचं पोलीस भरतीचं स्वप्न पूर्ण होणार असून त्यांना शासकीय नोकरीचा लाभ घेता येणार आहे.

Amit Ujagare

Police Bharati Revised GR 2025: राज्यात १५,६३१ पदांच्या पोलीस भरतीला राज्य शासनानं मान्यता दिली आहे. यासंदर्भात २० ऑगस्ट २०२५ रोजी शासन निर्णय अर्थात जीआर काढला होता. यामध्ये २०२२ व २०२३ या केवळ एक वर्षाच्या कालावधीत वयोमर्यादा ओलांडलेल्या तरुणांना एक वेळची विशेष बाब म्हणून या नव्या पोलीस भरतीत अर्ज करण्यास पात्र ठरवण्यात आलं होतं. पण या जीआरमध्ये वयोमर्यादेबाबत शासनानं आणखी बदल केला असून त्यात वाढ करण्यात आली आहे. १० सप्टेंबर २०२५ रोजी शासनानं हे शुद्धिपत्रक अर्थात सुधारित जीआर प्रसिद्ध केला आहे.

या सुधारित जीआरनुसार, महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसंच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत रिक्त झालेली तसंच १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत रिक्त होणाऱ्या एकूण १५,६३१ पदांच्या भरतीसाठी २० ऑगस्ट २०२५ रोजीच मान्यता देण्यात आली आहे. पण या शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक ४ मध्ये सन २०२२ व सन २०२३ मध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळछी विशेष बाब म्हणून प्रस्तूत भरती प्रक्रियेकरता अर्ज सादर करण्यास पात्र ठरवण्यात येत आहे, असं म्हटलं होतं.

पण आता सुधारित जीआर नुसार, हा परिच्छेद क्रमांक ४ मध्ये सन २०२२, २०२३, २०२४ व २०२५ मध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तूत भरती प्रक्रियेकरता अर्ज सादर करण्यास पात्र ठरवण्यात येत आहे, असं वाचावं, असं शासनानं म्हटलं आहे.

Police Bharati GR.pdf
Preview

म्हणजेच यापूर्वी काढलेल्या जीआरमध्ये केवळ २०२२ व २०२३ या दोन वर्षातील वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाच विशेष बाब म्हणून पात्र ठरवण्यात आलं होतं. पण आता २०२२ ते २०२५ अशा सलग चार वर्षांतील वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना विशेष बाब म्हणून पात्र ठरवण्यात आलं आहे. आता या नव्या बदलानुसार लवकरच भरतीचा संपूर्ण कार्यक्रम शासनाकडून जाहीर केला जाऊ शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT