A Post Office Franchise center in Pune offering postal services to customers. The Post Office Franchise scheme creates new self-employment opportunities for youth, women, and entrepreneurs. Sarkarnama
प्रशासन

Pune Post Office Franchise : पुणेकरांना 'पोस्ट ऑफिस' फ्रँचायझी घेण्याची मोठी संधी; टपाल विभागाकडून स्वयंरोजगाराला चालना, वाचा पात्रता अन् निकष

India Post Self Employment : फ्रँचायझीधारकांना विविध टपाल सेवांवर 30 % टक्क्यांपर्यंत कमिशन मिळू शकते. आंतरराष्ट्रीय व्यावसायिक निर्यातीशी संबंधित टपाल सेवांसाठीही पात्र श्रेणीतील अर्जदारांना याद्वारे संधी देण्यात आली आहे.

Sudesh Mitkar

Pune News, 07 Jul : पुण्यातील सुशिक्षित युवक, महिला आणि लघु उद्योजकांसाठी भारतीय टपाल विभागाने एक सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. शहरामध्ये पोस्ट ऑफिसची फ्रँचायझी सुरू करण्यासाठी टपाल विभागाने अर्ज मागवले असून, याद्वारे नागरिकांना स्वयंरोजगाराची नवीन संधी मिळणार आहे. या उपक्रमामुळे टपाल सेवा नागरिकांच्या अधिक जवळ पोहोचण्यास मदत होणार आहे.

पात्रता आणि निकष

फ्रँचायझी घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे काही पात्रता असणे आवश्यक असणार आहे. अर्जदाराचे वय १८ वर्षे किंवा त्याहून अधिक असावे. तसेच शिक्षण किमान १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्जदारास संगणकाचे मूलभूत ज्ञन असणे आवश्यक आहे.

कोण अर्ज करू शकते?

सामान्य व्यक्ती, व्यावसायिक फर्म आणि ॲग्रीगेटर या उपक्रमासाठी अर्ज करू शकतात. दुकान किंवा कार्यालयासाठी योग्य आणि पुरेशी जागा असणे गरजेचे आहे. कामकाजासाठी डेस्कटॉप, लॅपटॉप किंवा स्मार्टफोन असणे आवश्यक आहे. याशिवाय बारकोड स्कॅनर, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा आणि उत्तम इंटरनेट सुविधा असणे बंधनकारक आहे.

मिळणारे फायदे आणि कमिशन:

फ्रँचायझीधारकांना विविध टपाल सेवांवर 30 % टक्क्यांपर्यंत कमिशन मिळू शकते. आंतरराष्ट्रीय व्यावसायिक निर्यातीशी संबंधित टपाल सेवांसाठीही पात्र श्रेणीतील अर्जदारांना याद्वारे संधी देण्यात आली आहे.

पुणे शहरातील वाढत्या निवासी आणि व्यावसायिक भागांमध्ये अशी केंद्रे सुरू झाल्यामुळे नागरिकांना टपाल सेवा अधिक सुलभतेने आणि गतीने उपलब्ध होणार आहेत. ग्रामीण व शहरी भागातील इच्छुकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT