Railway Recruitment Sarkarnama
प्रशासन

Railway Recruitment : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! 6000 हून अधिक पदांसाठी रेल्वे भरती; संधी दवडू नका इथेच करा अर्ज!

Railway Recruitment Indian Railways job vacancy 2025 : रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, रेल्वेत सध्या टेक्निशियन पदांसाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करा.

Rashmi Mane

रेल्वे विभागात नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे भरती बोर्डाने तब्बल 6180 टेक्निशियन पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली असून, यासाठी अधिसूचनादेखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.

भरतीची मुख्य माहिती:

एकूण पदसंख्या: 6180

  • टेक्निशियन ग्रेड 1 (सिग्नल): 180 पदे

  • टेक्निशियन ग्रेड 3 (ओपन लाइन): 6000 पदे

अर्ज प्रक्रिया:

  • अर्ज सुरू होण्याची तारीख: 28 जून 2025

  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 28 जुलै 2025

  • अर्ज Online पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता:

टेक्निशियन ग्रेड 3 साठी:

  • उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा.

  • संबंधित ट्रेडमध्ये NCVT/SCVT मान्यताप्राप्त आयटीआय पूर्ण केलेले असावे.

टेक्निशियन ग्रेड 1 साठी:

बीएससी (फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स) पदवी किंवा संबंधित क्षेत्रात डिप्लोमा किंवा ऑफ सायन्स (फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स, IT, इन्स्ट्रुमेंटेशन) मध्ये बॅचलर डिग्री.

वयोमर्यादा:

  • टेक्निशियन ग्रेड 3 साठी: 18 ते 33 वर्षे

  • टेक्निशियन ग्रेड 1 साठी: कमाल वयोमर्यादा 36 वर्षे

निवड प्रक्रिया:

  • उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाईल.

  • परीक्षेचे स्वरूप, विषय, गुण आणि इतर माहिती अधिसूचनेत नमूद करण्यात आलेली आहे.

पगार आणि फायदे:

  • टेक्निशियन ग्रेड १ (सिग्नल): 29,200 महिना

  • टेक्निशियन ग्रेड 3 : 19,900 महिना

  • इतर भत्ते सरकारी नियमानुसार लागू होतील.

अर्ज शुल्क:

  • सामान्य प्रवर्ग: 500

  • राखीव प्रवर्ग (SC/ST/OBC/महिला/अपंग): शुल्क सवलत

SCROLL FOR NEXT