Revenue Minister Chandrashekhar Bawankule cancels Jijibhoy Trust lease proposal and orders refund, following Shiv Sena (UBT) allegations of land misuse in Mazgaon. Sarkarnama
प्रशासन

Revenue Department : ट्रस्टच्या आडून सरकारी जागा हडपण्याचा प्लॅन उधळला; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा दणका

Revenue Department : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माझगावमधील जीजीभॉय ट्रस्टचा भाडेपट्टा प्रस्ताव रद्द करत, ट्रस्ट किंवा विकासकाने भरलेली रक्कम परत करण्याचे निर्देश दिले आहेत.

Hrishikesh Nalagune

Revenue Minister Chandrashekhar Bawankule : पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जागेवरून सुरु असलेला वाद अद्याप शमलेला नाही. अशात मुंबईतील माझगावमधील जीजीभॉय ट्रस्टला दिलेला शासकीय भाडेपट्ट्याचा प्रस्ताव महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नामंजूर केला आहे. तसेच ट्रस्ट किंवा विकासकाने चुकीच्या पद्धतीने भरलेली रक्कम परत करावी, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात याबाबतची बैठक पार पडली. यावेळी आमदार सचिन अहिर, अमोल मिटकरी, मुंबई शहरच्या आंचल गोयल उपस्थित होत्या. मुंबईत काही व्यापारी शासनाच्या जमिनी ट्रस्टच्या नावाखाली हडपण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला होता. या गोष्टीला तातडीने मज्जाव झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली होती.

या प्रकरणाबाबत अधिक माहिती अशी की, माझगाव महसूल विभागातील भुकर क्रमांक ३६५ (क्षेत्र ७२५.७६ चौ.मी.) व भुकर क्रमांक ३६९ (क्षेत्र ९१५४.१० चौ.मी.) या मिळकतींचा भाडेपट्टा जे. पी. एम. जीजीभॉय ट्रस्ट यांच्याकडे होता. ट्रस्टने नूतनीकरणाची रक्कम भरण्यास विलंब केला होता. अशात नूतनीकरणाची रक्कम ऐक्य रिअॅलिटी प्रा. लिमिटेड या कंपनीकडून शासनखाती भरणा करण्यात आली होती.

इथेच या भाडेपट्ट्याबाबतचा संशय बळावला. त्यानंतर बावनकुळे यांच्या दालनात या प्रकणारवर सुनावणी पार पडली आणि त्यांनी शासकीय भाडेपट्ट्याचा प्रस्ताव नामंजूर केला. तसेच ट्रस्ट किंवा विकासकाने चुकीच्या पद्धतीने भरलेली रक्कम परत करावी, असे निर्देशही त्यांनी या बैठकीत दिले आहेत. दरम्यान, आमदार अहिर यांनी हे भूखंड तातडीने शासनाने ताब्यात घ्यावेत, अशी मागणी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT