An alleged audio clip involving Vaijapur RTO officer Ganesh Vighne has triggered controversy, prompting Transport Minister Pratap Sarnaik to order an inquiry and action. Sarkarnama
प्रशासन

RTO Maharashtra : "आमच्या हद्दीत आलास तर..." : प्रामाणिक RTO अधिकाऱ्याला वरिष्ठाची दमदाटी; व्हायरल ऑडिओ क्लिपनंतर 'मंत्र्यांचा हंटर'

RTO Maharashtra : अतिअवजड वाहनांवरील कारवाईवरून वैजापूर आरटीओचे प्रभारी अधिकारी गणेश विघ्ने आणि निरीक्षक योगेश मोरे यांच्यातील कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

Hrishikesh Nalagune

RTO Maharashtra : शासनाचा महसूल बुडवणाऱ्या अतिअवजड वाहनांवर कायदेशीर कारवाई करणाऱ्या परिवहन विभागातील निरीक्षकाला दमदाटीचा प्रकार घडला. ‘आमच्या हद्दीत कारवाई करायची नाही’ असा थेट धमकीवजा इशारा वैजापूर आरटीओ कार्यालयाचे प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गणेश विघ्ने यांनी श्रीरामपूरच्या पथकाला दिला.

गणेश विघ्ने व योगेश मोरे यांच्यातील संभाषणाची ‘ऑडिओ क्लिप’ समाज माध्यमांवर सोमवारी व्हायरल झाली. या घटनेची गंभीर दखल परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली असून, कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.

नेमका प्रकार काय?

श्रीरामपूरच्या वायुवेग (भरारी) पथकातील मोटार वाहन निरीक्षक योगेश मोरे यांनी एका अतिअवजड आणि सलग दोन वर्षे शासनाचा कर चुकवलेल्या वाहनावर धडक कारवाई केली. यात संबंधित वाहनचालकाला ६७ हजार रुपयांचा दंड केला. मात्र या करबुडव्या वाहनचालकाच्या बचावाच्या उद्देशाने बीडचे मोटार वाहन निरीक्षक तथा वैजापूर आरटीओ कार्यालयाचे प्रभारी अधिकारी गणेश विघ्ने यांनी श्रीरामपूर पथकातील अधिकाऱ्यांशी हद्दीवरून जोरदार वाद घातला.

आपल्या पदाचा रुबाब दाखवत विघ्ने यांनी संबंधित अधिकाऱ्याला ‘आमच्या हद्दीत येऊन कारवाई का केली?’ असा जाब विचारला आणि वैजापूरच्या हद्दीत यापुढे कोणतीही कारवाई न करण्याच्या सूचना दिल्या. यानिमित्ताने आरटीओ विभागातील अंतर्गत राजकारण आणि भ्रष्ट साखळी उघडी पडली आहे.

घडलेला प्रकार अत्यंत चुकीचा आहे. मी परिवहन आयुक्तांना या संदर्भात आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. असला गैरप्रकार सहन केला जाणार नाही. दोषींवर नक्कीच कारवाई होईल. - प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT