MLC Election : नाशिक विधानपरिषदेसाठी भाजपने बजावला मतदारांना व्हीप, कलम 25 अन्वये कारवाईचा इशारा...

Nashik MLC Election, BJP Whip : भाजपने नाशिकमधील आपल्या दोन अपक्ष उमेदवारांचे बंड थंड करत शिवसेनेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना मतदान करावे असा व्हीप पक्षातील नगरसेवक मतदारांना बजावला.
Girish Mahajan, Devendra Fadnavis, Narendra Darade, Nashik Legislative Council election
Girish Mahajan, Devendra Fadnavis, Narendra Darade, Nashik Legislative Council electionSarkarnama
Published on
Updated on

Nashik MLC Election : नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये अपक्ष गोकुळ गिते व प्रसाद हिरे या दोघांचे बंड थोपवण्यात आले असले तरी महायुती अलर्ट मोडमध्ये आहे. दोन दिवसांपूर्वी शिवसेनेच्या नगरसेवकांना ठाणे जिल्ह्यातील एका रिसॉर्टमध्ये हलवण्यात आलं आहे. तर काल सोमवारी (दि. १५) भाजपचे मतदार देखील ठाण्याकडे रवाना झाले.

यावेळी भाजपतर्फे मतदारांना महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना मतदान करण्याबाबत व्हीप बजावण्यात आला. या व्हीपमध्ये पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्या आदेशान्वये अधिकृत उमेदवाराला मतदान करावे, अन्यथा पक्षाच्या घटनेतील कलम 25 अन्वये कार्यवाही केली जाईल, असा इशारा देण्यात आला. त्यामुळे राजकीय क्षेत्रात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

नाशिक विधान परिषद निवडणुकीत अभूतपूर्व माघारीनाट्य रंगले होते. अपक्ष गोकुळ गिते यांची माघार घेण्यासाठी महायुतीची दमछाक झाली. गिते तसेच प्रसाद हिरे यांचे बंड थंड केल्यानंतर महायुतीचे उमदेवार नरेंद्र दराडे यांच्या दृष्टीने ही निवडणूक अधिक सोपी झाल्याचे मानले जात होते. परंतु महायुतीमधील घटक पक्षांमधील नाराजीनाट्य काही अंशी कायम असल्याचे चित्र असून त्यादृष्टीने खबरदारी घेतली जात आहे. निवडणुकीत ऐनवेळी कोणताही दगाफटका नको म्हणून महायुतीतर्फे तिन्ही पक्षातील नगरसेवकांची सहल घडविण्यात येत आहे.

Girish Mahajan, Devendra Fadnavis, Narendra Darade, Nashik Legislative Council election
MLC Election : नाशिकचे सगळे नगरसेवक भिंवडीतील त्या रिसॉर्टवर एकत्रित आणले जाणार; CM फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्री करणार मार्गदर्शन

शहरातील एका हॉटेलमधून सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास भाजपचे मतदार सहलीसाठी रवाना झाले. तत्पूर्वी या मतदारांना एकत्रित जमविताना महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाल्याचे पाहायला मिळाले.

भाजपच्या मतदारांना दुपारी दोन वाजेची वेळ दिली होती. त्यानुसार पाथर्डी फाटा येथील हॉटेलमध्ये त्यापूर्वी जमण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, रवाना होण्याची वेळ जवळ येऊनही बहुतेक मतदार पोहोचलेले नव्हते. त्यामुळे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची धाकधूक वाढली. या वेळी प्रत्येक मतदाराशी संबंधित पदाधिकारी वैयक्तिकरीत्या संपर्क साधत होते.

Girish Mahajan, Devendra Fadnavis, Narendra Darade, Nashik Legislative Council election
MLC Election : नाशिकमध्ये महायुतीचा एकच उमेदवार तरी कसली भीती? ठाण्यातील आलिशान हॉटेलमध्ये नगरसेवकांसाठी 'अभ्यास वर्ग' आणि मंत्र्यांचे सत्र

अखेर दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सर्व मतदार जमा झाल्यानंतर प्रथम भाजपतर्फे मतदानासंदर्भात त्यांना व्हीप बजावण्यात आला. त्यानंतर विविध वाहनांमधून हे मतदार ठाण्याच्या दिशेने रवाना झाले. दरम्यान राष्ट्रवादीचे मतदार आजून नाशिकमध्येच आहेत. ते आज रवाना होणार असल्याची माहिती आहे. तीन्ही पक्षातील मतदारांना ठाणे जिल्ह्यातील एका रिसॉर्टमध्ये ठेवण्यात येणार आहे. मतदानाच्या दिवशी त्यांना नाशिकमध्ये आणलं जाणार आहे. त्यापूर्वी मुख्यमंत्र्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री या मतदारांना मार्गदर्शन करणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com