Two government school teachers have been suspended by the State Education Department of Karnataka. Sarkarnama
प्रशासन

RSS संचलनात सहभागी होणे शिक्षकांना पडले महागात; गुरूराज जोशी अन् अण्णासाहेब देशमुख यांचं निलंबन, कर्नाटक सरकारचा निर्णय

Education department, Gururaj Joshi, Annasaheb Deshmukh : आरएसएसच्या पथसंचलनात सहभागामुळे सेवा नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप; सरकारी शिक्षकांवर निलंबनाची कारवाई, नऊ महिन्यांनंतर शिक्षण विभागाचा बडगा.

Rajanand More

Karnataka RSS news : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलनात सहभागी होणे दोन शिक्षकांना चांगलेच महागात पडले आहे. कर्नाटक सरकारने या दोन शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारत त्यांचे निलंबन केले आहे. या शिक्षकांनी मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात आरएसएसच्या वतीने काढण्यात आलेल्या संचलनात सहभाग घेतल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

गुरूराज जोशी आणि अण्णासाहेब अशी या दोन शिक्षकांची नावे आहेत. कर्नाटकच्या यादगीर जिल्ह्याच्या पब्लिक इन्स्ट्रक्शन विभागाचे उपसंचालक चन्नाबसप्पा मुधोळ यांनी दोन शिक्षकांना निलंबनाची नोटीस धाडली आहे. जोशी हे मुलींच्या सरकारी शाळेमध्ये शिक्षक आहेत. तर देशमुख हे एका प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आहेत.

दोन्ही शाळा हुनासागी तालुक्यातील आहेत. सरकारने पथ संचलनानंतर नऊ महिन्यांनी या शिक्षकांवर निलंबनाची ही कारवाई केली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना राजकीय किंवा धार्मिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्यास मनाई करणाऱ्या सेवा नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

विजयपुरा जिल्ह्यात तालीकोटी येथे मागीलवर्षी ऑक्टोबर महिन्यात आरएसएसचे संचलन झाले होते. त्यामध्ये काही सरकारी शाळांमधील शिक्षकांनीही सहभाग घेतल्याची तक्रार काही संघटनांनी केली होती. त्या तक्रारीच्या आधारे शिक्षण विभागाकडून अनेक शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. विभागाकडून शिस्तभंगाची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते.

शिक्षण विभागाने त्यावेळी पाठवविलेल्या नोटिशीमध्ये RSS ‘पथसंचलना’मध्ये सहभागी होऊन संबंधित कर्मचाऱ्यांनी सरकारी सेवा नियमांचा भंग केल्याचे म्हटले होते. शिक्षकांना लेखी खुलासा तसेच प्रत्यक्ष हजर राहून आपले म्हणणे मांडण्याचे आदेश देण्यात आले होते. संबंधितांनी खुलासा केला नाही तर कारवाई केली जाईल, असेही नोटिशीमध्ये स्पष्ट करण्यात आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT