Big Relief for Maharashtra Teachers: राज्यातील प्राथमिक शिक्षकांसाठी दिलासादायक बातमी आहे. इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीच्या नवीन अभ्यासक्रमासाठी होणारे तालुकास्तरीय शिक्षक प्रशिक्षण सध्या पुढे ढकलण्यात आले आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद म्हणजेच SCERT ने याबाबत अधिकृत पत्र काढले आहे.
२०२७ च्या जनगणनेची तयारी आता सुरू झाली आहे. १६ मे ते १४ जून या कालावधीत कुटुंब गणनेचे काम होणार आहे. या कामासाठी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील बहुतांश शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक शिक्षक जनगणनेच्या कामात व्यस्त राहणार आहेत.
मात्र याच काळात नवीन अभ्यासक्रमासाठी शिक्षक प्रशिक्षणाचे कार्यक्रमही निश्चित करण्यात आले होते. एकाच वेळी जनगणना आणि प्रशिक्षण अशी दुहेरी जबाबदारी शिक्षकांवर येणार होती. त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी होती. अनेकांनी प्रशिक्षणाच्या तारखा पुढे ढकलण्याची मागणी केली होती.
ही बाब लक्षात घेत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने पुढाकार घेतला. समितीचे राज्याध्यक्ष विजय कोबे (Vijay Kombe) यांनी SCERT तसेच जनगणना विभागाकडे पाठपुरावा केला. सर्व जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदने देण्यात आली होती.
दरम्यान मंत्रालयात झालेल्या बैठकीत शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर ( Dr. Pankaj Bhoyar) यांच्यासमोरही हा विषय मांडण्यात आला. त्यानंतर शिक्षण विभागाने परिस्थितीचा आढावा घेत प्रशिक्षण पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.
SCERT चे संचालक डॉ. हेमंत कुमार वसेकर( Dr. Hemant Kumar Wasekar) यांनी याबाबत अधिकृत पत्र जारी केले आहे. त्यामुळे आता शिक्षकांना जनगणनेचे काम शांतपणे पूर्ण करता येणार आहे.
शिक्षक संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, “एकाच वेळी दोन मोठी कामे आल्याने शिक्षकांवर ताण वाढत होता. आता हा ताण कमी झाला आहे,” अशी प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
इयत्ता २ री, ३ री आणि ४ थीच्या प्रशिक्षणाच्या तारखा पुढे ढकलल्या
कारण – २०२७ जनगणनेचे काम
१६ मे ते १४ जूनदरम्यान कुटुंब गणना होणार
बहुतांश शिक्षक जनगणनेच्या कामात सहभागी
शिक्षक संघटनांच्या मागणीनंतर निर्णय
SCERT कडून अधिकृत पत्र जारी
शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.