PI Transfers in Pune :  Sarkarnama
प्रशासन

Police Transfers : पुणे शहर पोलिस दलात बदल, दहा पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या!

सरकारनामा ब्यूरो

Pune News : पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे शहर पोलिस दलातील दहा पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदली करण्याचे आदेश काढले आहेत. त्यामुळे शहरातील पोलिस दलात बदल झाले आहेत. अंलकार पोलिस ठाण्यातील गुन्हे शाखेला नवीन पीआय मिळाले आहेत.तर, आर्थिक गुन्हे शाखेत नवीन अधिकारी आले आहेत.

पोलिस आयुक्तांनी काढलेल्या आदेशानुसार, गुन्हे शाखा युनिट 6 मध्ये कार्यरत असलेले रजनीश निर्मल यांची आर्थिक गुन्हे शाखा येथे बदली करण्यात आली आहे.तर, वाहतूक शाखेतील उल्हास कदम यांची गुन्हे शाखा युनिट 6 तर, विक्रम गौड यांची शिवाजी नगर पोलिस ठाणे गुन्हे शाखेतून वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोंढवा पोलिस ठाणेमध्ये गुन्हे शाखेत कार्यरत असलेले संजय मोगले यांची ते वाहतूक शाखेत तर, नियंत्रण कक्षातील रवींद्र कदम यांची गुन्हे शिवाजीनगर पोलिस ठाणे येथे बदली करण्यात आली आहे. स्वारेगट पोलिस ठाण्यातील गुन्हे शाखेतील सोमनाथ जाधव यांची गुन्हे शाखा,युनिट 4 मध्ये तर, अलंकार पोलिस ठाण्यातील गुन्हे विभागातील संगीता पाटील यांची गुन्हे शाखा स्वारगेट पोलीस ठाणे येथे बदली करण्यात आली आहे.

गुन्हे शाखा युनिट 4 मधील गणेश माने यांची आर्थिक गुन्हे शाखा, मानसिंग पाटील यांची खडकी पोलिस ठाण्यातून गुन्हे,कोंढवा पोलिस ठाणे तर, सुरेखा चव्हाण यांची नियंत्रण कक्षातून अंलकार पोलिस ठाणे गुन्हे विभागात बदली करण्यात आली आहे.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT