Chhatrapati Sambhajinagar Constituency : भागवत कराड यांचा `कॉन्फिडन्स`, खैरे असो की दानवे माझ्यासाठी सोपेच...

Shivsena V/S Bjp : छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात कराड विरुद्ध खैरे अशी लढत पाहायला मिळण्याची शक्यता.
Sambhajinagar Loksabha Constituency
Sambhajinagar Loksabha ConstituencySarkarnama

Marathwada BJP News : छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी उमेदवारी बाबतची चुरसही वाढताना दिसत आहे. महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी आणि एमआयएम अशी तिरंगी लढत या मतदारसंघात पाहायला मिळणार आहे. (Chhatrapati Sambhajinagar Constituency) भाजपकडून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी संभाव्य उमेदवार म्हणून जोरदार तयारी सुरू केली आहे.

Sambhajinagar Loksabha Constituency
Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Constituency: राजकारण्यांच्या बातम्या छापणारे पत्रकार इम्तियाज जलील झाले खासदार...

तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) मैदानात असतील असे बोलले जाते. दरम्यान लोकसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून खैरे असो की दानवे माझ्यासाठी सोपेच आहे, असे म्हणत कराड (Dr.Bhagwat Karad) यांनी महाविकास आघाडीला आव्हान दिले आहे. कराड केंद्रात मंत्री झाल्यापासून जिल्हा व शहर विकासासाठी त्यांनी अनेक योजना आणल्या. यात प्रामुख्याने पाईपलाईन द्वारे गॅस पुरवठा, जायकवाडी पासून शहराला पाणीपुरवठा करणारी योजना याचा समावेश आहे.

कुठल्याही परिस्थितीत या योजना लोकसभा निवडणुकीपूर्वी पूर्ण करण्याचा कराड यांचा प्रयत्न आहे. मात्र विविध कारणांमुळे या योजना रखडल्या आहेत. (Shivsena) परिणामी लोकसभा निवडणुकीपूर्वी त्या पूर्ण होणे शक्य नसल्यामुळे कराडांची चलबिचल वाढली आहे. दर महिन्याला आढावा बैठका घेऊ नये या योजनांना गती मिळत नसल्याने कराड यांनी आता नवीन विकास कामाच्या उद्घाटनावर जोर दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

`विकसित भारत संकल्प यात्रे`च्या माध्यमातून केंद्र सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या योजनांच्या शिदोरीवरच कराड छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात विजय मिळवू पाहत आहेत. `मोदी गॅरंटी` वर भाजपाच्या नेत्यांना भलताच विश्वास असल्यामुळे कराडांनी खैरे-दानवे यापैकी कोणीही महाविकास आघाडीचा उमेदवार असला तरी आपल्याला त्याचा काही फरक पडणार नाही, असा दावा केला आहे.

तिकडे ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी खैरे- दानवे यांच्यात स्पर्धा सुरू असताना मातोश्रीवर झालेल्या बैठकीत मात्र पदाधिकाऱ्यांनी खैरे यांच्या नावालाच अनुकूलता दर्शवल्याचे समोर आले आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात कराड विरुद्ध खैरे अशी लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. शिंदे गटाकडून मात्र ही जागा आमचीच, आम्हीच लढणार, तेही धनुष्यबाणावरच या त्याच त्याच वाक्याशिवाय कुठलीही तयारी दिसत नाही. यावरून शिंदे गटाने छत्रपती संभाजीनगरची जागा भाजपला सोडली की काय? असा सवाल उपस्थीत केला जात आहे.

Edited By : Jagdish Pansare

Sambhajinagar Loksabha Constituency
औरंगाबाद शहरात मेट्रो लाईन साठी प्रयत्न; केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड,पाहा व्हिडिओ

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com