Transfers of Administrative Officers Sarkarnama
प्रशासन

Transfers of Administrative Officers : राज्यातील अधिकारी अन् कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, प्रशासकीय बदल्यांचा मुहूर्त ठरला!

Rashmi Mane

Transfer Date of Govt Officers : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या प्रशासकीय बदल्या रखडल्या होत्या. शासकीय अधिकारी (Government officials) आणि कर्मचार्‍यांच्या बदल्यांचा मुहूर्त केव्हा लागणार असा प्रश्नही उपस्थित केला जात होता.

विधानसभा निवडणुकीचे बिगुल केव्हाही वाजू शकते. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात आचारसंहिता लागण्याचे संकेत असून यंदा प्रशासकीय बदल्या होणार की नाही, याबाबत चित्र अस्पष्ट होते. त्यातच आता यासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बदल्या करण्यासाठी 31 ऑगस्ट ही अंतिम तारीख देण्यात आली आहे.

सामान्य प्रशासनाच्या नियमानुसार आणि बदली अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार दरवर्षी साधारणतः एप्रिल ते मे महिन्यामध्ये अखेर प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या होत असतात. यंदा मे महिन्यात लागू असणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या रखडल्या होत्या. मात्र, आता राज्यपालांच्या (Governor) स्वाक्षरीने अध्यादेश जारी करण्यात आला असून 31 ऑगस्ट 2024 ही अंतिम तारीख देण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet Meeting) बदल्यांसाठी 31 ऑगस्टपर्यंतची मुदतवाढ देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला होता.

31 ऑगस्ट 2024 ही अंतिम तारीख दिल्याने दोन दिवसात अधिकार्‍यांच्या बदल्या होण्याची शक्यता वर्तवली जातेय. या बदल्या रखडल्यामुळे तब्बल 39 विभागातील 31 हजार अधिकारी आणि कर्मचारी वेटींगवर आहेत. या बदल्यांकडे सर्व कर्मचारी कर्मचारी बदली कधी होणार? याकडे नजरा लावून आहेत.

सर्व विभागातील अधिकाऱ्यांना बदल्यांची उत्सुकता लागली आहे. अनेक अधिकारी मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवत असल्याचंही बोललं जाते. त्यामुळे आता कोणत्या विभागातील, कोणत्या अधिकाऱ्यांच्या कुठे बदल्या होणार? हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. पण बदल्यांसाठी फक्त दोनच दिवस बाकी राहिले आहेत. त्यामुळे या दोन दिवसात काय काय निर्णय होणार याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT