FDA Maharashtra : राज्यातील धडाकेबाज आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले तुकाराम मुंढे यांनी २५ मे रोजी अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत कामकाजाला सुरुवात केली आहे.
पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी अवैध गुटखा विक्री, भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. मिळालालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत राज्यभरातील विविध भागांमध्ये छापेमारी करून २८ दुकानांवर कारवाई करण्यात आली असून ३३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या कारवायांनंतर आता मुंढे यांनी ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींविरोधात मोर्चा वळवला आहे. सध्याच्या स्पर्धेच्या युगात अनेक कंपन्या आपल्या उत्पादनांची विक्री वाढवण्यासाठी आकर्षक आणि भ्रामक जाहिरातींचा आधार घेतात. या जाहिरातींमध्ये उत्पादनांबाबत खूप मोठमोठे किंवा खोटे दावे केले जातात.
अशा दाव्यांमुळे ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासन आता अधिक कठोर भूमिका घेणार असल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे, या कारवाईच्या कक्षेत केवळ उत्पादन करणाऱ्या कंपन्याच नव्हे तर त्या उत्पादनांचा प्रचार करणारे सेलिब्रिटी, जाहिरातदार आणि मार्केटिंगशी संबंधित इतर घटकांचाही समावेश असणार आहे.
पैशांच्या मोबदल्यात कोणत्याही उत्पादनाची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटींनाही आता त्यांच्या दाव्यांची जबाबदारी घ्यावी लागणार आहे. मुंढे यांनी स्पष्ट केले की, ग्राहकांपर्यंत उत्पादन पोहोचवण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत सहभागी असलेल्या प्रत्येक घटकाची जबाबदारी निश्चित केली जाईल.
एखादी जाहिरात दिशाभूल करणारी आढळल्यास उत्पादक, जाहिरातदार आणि ब्रँड अॅम्बेसेडर या सर्वांविरोधात कठोर कारवाई केली जाऊ शकते. तुकाराम मुंढे यांच्या या निर्णयामुळे ग्राहकांच्या हिताचे संरक्षण होण्यास मदत होणार असून कंपन्यांना देखील जाहिराती करताना अधिक जबाबदारीने व वास्तववादी दावे करावे लागतील, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.