Gokul News: गोकुळमध्ये मोठी घडामोड: ऐन निवडणुकीच्या धामधुमीत 427 दूध संस्था अपात्र

Gokul Politics: गेल्या काही दिवसापासून गोकुळ दूध संघातील राजकारण उफाळून आले आहे. सत्ताधारी गटाला विरोधी गटाकडून घेरण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र सध्याची राजकीय गणित पाहता आमदार सतेज पाटील वगळता महायुती म्हणून सर्व एकत्र आल्याने एकमेकांच्या विरोधात कुरघोड्या सुरु आहेत.
Gokul News
Gokul NewsSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या गोकुळ दूध संघाच्या राजकारणावरून मोठी खळबळ उडाली आहे. सतत प्रशासक काळातील पहिला दणका सत्ताधारी आणि विरोधकांना बसला आहे. विभागीय दुग्ध निबंधकांकडून गोकुळमधील 427 दुधसंस्थांवर अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे गोकुळ दूध संघाच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे पावसाळ्यात निघालेल्या 1320 दूध संस्थांचा यामध्ये समावेश नाही. प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार या 427 दुधसंस्थांचे लेखापरीक्षण नाही, दूध संकलन नाही किंवा दूध संकलन कमी आहे. दूध संस्थेची कोणतीही निवडणूक नाही या कारणावरून या संस्था अपात्र करण्यात आले आहेत.

आठवड्यापूर्वी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. सध्या गोकुळकडे 5427 सभासद नोंदणी आहे. त्यातील 1320 दुध संस्थांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे.

येत्या काही काळात या दूध संस्थांची सुनावणी होऊन यातील काही संस्था अपात्र होण्याची शक्यता आहे. अशातच 427 दुध संस्था अपात्र केल्याने सत्ताधारी व विरोधकांना मोठा धक्का मानला जातो.

Gokul News
Gokul Politics : ‘ऑपरेशन अपात्र’, 'गोकुळ'मध्ये सत्ताधारी, विरोधकांना धक्का! 'यांची' विकेट पडणार, 1 जूनला फैसला!

राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप- प्रत्यारोपांचा खेळ सुरु आहे. सत्ताधाऱ्यांनी वाढवलेल्या 1308 दूध संस्था त्याला कारणीभूत आहे. त्याला न्यायालयात आव्हान दिल्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच करून 80 दिवसात चौकशी करून निवडणूक घेण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याची चौकशी सुरु झाली असून त्यातील काही संस्था रद्द ठरण्याची शक्यता आहे.

गोकुळमधील सुमारे 350 अधिक दूध संस्था 'डेंचर झोन'मध्ये आहेत. नियमांचे गणित मांडले असता या संस्था अपात्र ठरण्याच्या मार्गावर आहेत. गोकुळ संघाकडून साहाय्यक निबंधक (दुग्ध) यांच्याकडे दिलेल्या यादीनुसार 5470 संस्थांची यादी दिली आहे. मात्र, सर्व निकष पाहता यातील सुमारे 350 अधिक संस्था अपात्र ठरणार असल्याचे स्पष्ट होते. 1 जूनला याचा निश्चित आकडा अधिकृत जाहीर केला जाणार होता.

Gokul News
Bharat Gogawale : 'MLC'च्या जागेवरून महायुतीत डिल? गोगावलेंच्या पालकमंत्री पदाच्या वक्तव्याने चर्चांना उधाण; अखेर हायव्होल्टेज ड्रामा संपला?

गेल्या काही दिवसापासून गोकुळ दूध संघातील राजकारण उफाळून आले आहे. सत्ताधारी गटाला विरोधी गटाकडून घेरण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र सध्याची राजकीय गणित पाहता आमदार सतेज पाटील वगळता महायुती म्हणून सर्व एकत्र आल्याने एकमेकांच्या विरोधात कुरघोड्या सुरु आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com