Who will be Appointed Mumbai CP Sarkarnama
प्रशासन

Mumbai Police Commissioner: मुंबईची जबाबदारी 'लेडी सिंघम'वर? ; कोण होणार आयुक्त, चार नावे चर्चेत

Who will be Appointed Mumbai CP: फणसळकर यांना मुदतवाढ मिळणार असल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात सुरू आहे. पण फणसळकरांना मुदतवाढ न मिळाल्यास आयुक्तपदी कोणाची नियुक्ती होणार याबाबत चर्चांना उधाण आले आहे.

Mangesh Mahale

Mumbai, 29 Apr 2025: मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर उद्या (बुधवारी) सेवानिवृत्त होत आहेत.त्यांच्या जागी कोण येणार याबाबत उत्सुकता वाढली आहे. या पदासाठी चार अधिकाऱ्यांची नावे चर्चेत आहेत.

फणसळकर यांच्या निवृत्तीपर्यंत मुंबई पोलीस आयुक्तपदाच्या नियुक्तीबाबत कोणताही निर्णय झाला नाही, तर अतिरिक्त कार्यभार देवेन भारती यांना सुपूर्द केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे महायुती सरकार मुंबईची जबाबदारी 'लेडी सिंघम'वर देणार असल्याची चर्चा आहे.

फणसळकर यांना मुदतवाढ मिळणार असल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात सुरू आहे. पण फणसळकरांना मुदतवाढ न मिळाल्यास आयुक्तपदी कोणाची नियुक्ती होणार याबाबत चर्चांना उधाण आले आहे.

मुंबई पोलिस आयुक्त पदासाठी सेवाज्येष्ठतेनुसार महासंचालक संजयकुमार वर्मा यांच्यासह सदानंद दाते, अर्चना त्यागी आणि विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती यांची नावे विशेष चर्चेत आहेत.

पोलिस आयुक्तपदाची श्रेणी कमी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्यास विशेष आयुक्त देवेन भारती हे या पदाचे प्रमुख दावेदार ठरण्याची शक्यता आहे. भारती यांनी गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्तपद यशस्वीरीत्या हाताळले आहे. सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था)या पदावर ते सर्वाधिक काळ कार्यरत होते.

संजयकुमार वर्मा

  • पोलिस सेवेतील ज्येष्ठतेनुसार १९९० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी

  • संजय कुमार वर्मा हे आयुक्तपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

  • एप्रिल २०२८ मध्ये निवृत्त होणार असलेल्या वर्मा यांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये काही काळासाठी पोलिस महासंचालक म्हणून काम केले होते.

अर्चना त्यागी

  • महिला अधिकारी म्हणून १९९३ च्या बॅचच्या अर्चना त्यागी या प्रबळ दावेदार आहेत.

  • मुंबईच्या आयुक्तपदी पहिल्या महिला अधिकारी म्हणून त्यागी यांची नियुक्ती केली जाऊ शकते.

  • सध्या महाराष्ट्र पोलिस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाच्या त्या व्यवस्थापकीय संचालक आहेत.

सदानंद दाते

  • कर्तव्यनिष्ठ अधिकारी असलेले दाते यांनी मुंबईसह आणि केंद्रात महत्त्वाच्या, संवेदनशील जबाबदाऱ्या हाताळल्या आहेत.

  • मुंबईचे सहआयुक्त (गुन्हे), राज्य दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख पदही त्यांनी हाताळले आहे.

  • सदानंद दाते सध्या ‘एनआयए’चे प्रमुख म्हणून प्रतिनियुक्तीवर आहे.

देवेन भारती

मुंबईच्या विशेष पोलिस आयुक्त असलेले देवेन भारती यांचे नावही आयुक्तपदासाठी चर्चेत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT