Gangster Lawrence Bishnoi Latest Marathi News, Pune Latest Marathi News
Gangster Lawrence Bishnoi Latest Marathi News, Pune Latest Marathi News  Sarkarnama
पुणे

धक्कादायक : पुण्याच्या ग्रामीण भागातील अकरा तरूण बिश्नोई गँगच्या संपर्कात

सरकारनामा ब्युरो

पुणे : राण्या अण्णासाहेब बाणखेले यांची गोळ्या घालून हत्या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी नुकतेच सिद्धेश उर्फ सौरभ महाकाळ याला काही दिवसांपूर्वीच अटक केली आहे. त्याच्याकडे केलेल्या तपासात पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली आहे. पुणे ग्रामीण भागातील अकरा तरूण गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्या गँगच्या संपर्कात असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. (Lawrence Bishnoi Latest News)

पंजाबमधील प्रसिध्द गायक सिध्दू मुसेवाला यांच्या हत्याप्रकरणात बिश्नोईचा हात असल्याचा संशय आहे. याप्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली असून सध्या तो तुरुंगात आहे. याच प्रकरणात कांबळेसह कुख्यात गुंड संतोष जाधवलाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी कांबळे याच्याकडे केलेल्या चौकशी अकरा तरूणांबाबत माहिती मिळाली आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेता सलमान खान व त्याच्या वडिलांनाही बिश्नोई गँगने धमकी दिली आहे. (11 youths in rural Pune in contact with Bishnoi Gang)

पुण्याच्या ग्रामीण भागातील ११ तरुण बिश्नोई गँग च्या संपर्कात असल्याची माहितीही समोर आली आहे. ग्रामीण भागातील अल्पवयीन तरुणाईला गुन्हेगारी क्षेत्राकडे खेचण्याचा प्रयत्न या गँगकडुन केला जात असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे आता या तरूणांचा शोध घेण्याचे आव्हानही पोलिसांसमोर असणार आहे.

कोण आहे गँगस्टर बिश्नोई?

बिश्नोई हा सध्या दिल्ली पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याला पहिल्यांदा 2016 मध्ये अटक कऱण्यात आली होती. त्याच्यावर खून, खूनाचा प्रयत्न, खंडणी वसुली, दरोडा असे 50 हून अधिक गुन्हे दाखल आहे. तो आधी राजस्थानमधील तुरुंगात होता. पण वर्षभरापूर्वी मोक्काअंतर्गत त्याला दिल्लीतील तिहार तुरुंगात आणण्यात आले. तेव्हापासून तो तिथेच आहे.

लॉरेन्सचा जन्म पंजाबमधीलआहे. महाविद्यालयीन निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्याच्यावर पहिला गुन्हा दाखल झाला होता. नंतर त्याचे नाव गँगवारमध्ये समोर येऊ लागले. सध्या देशातील विविध राज्यांमध्ये त्याची गँग सक्रीय असल्याचे बोलले जाते. सहा-सात वर्षांपूर्वी हरयाणातील गँगस्टर संदीप उर्फ काला जठेडी याच्यासोबत मिळून त्याने आपली गँग तयार केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT