लसीकरण सरकारनामा
पुणे

पुण्यात कोरोनाचे ११३ नवे रूग्ण

पुण्यात बाजारपेठ सुरळित झाली असून दिवाळीच्या काळात पुण्यात खरेदीसाठी गर्दीचा महापूर लोटला होता.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : कोरोनाच्या रूग्णसंख्येत पुण्यात आज दिवसभरात ११३ रूग्णांची भर पडली आहे. ५९ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ११४ क्रिटिकल रूग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यातील सर्व रूग्णालयात मिळून ७०१ पॉझिटिव्ह रूग्ण आहेत.दरम्यान,आज पाच हजार ५४ नुमन्यांची तपासणी करण्यात आली.

गेल्या वीस महिन्यात पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या पाच लाख चार हजार ९१९ इतकी असून कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांची संख्या चार लाख ९५ हजार १४१ इतकी आहे.आतापर्यंत एकुण नऊ हजार ७७ जणांचा कोरोनाने यात बळी गेला आहे.

पुण्यात बाजारपेठ सुरळित झाली असून दिवाळीच्या काळात पुण्यात खरेदीसाठी गर्दीचा महापूर लोटला होता.सलग महिनाभर पुण्यातील बाजारपेठेत गर्दी असूनदेखील कोरोनाचा आकडा सातत्याने कमी होत असल्याने कोरोनाचा धोका जवळपास दूर झाल्याचे सांगण्यात येत आहे.

आरोग्य क्षेत्रातील तज्ञांच्या मतानुसार कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण सध्या अल्प असले तरी पुढील काही महिने काळजी घेण्याची गरज आहे. विशेषत: यापुढच्या थंडीच्या दिवसात काळजी घेण्याची गरज तज्ञांनी व्यक्त केली आहे.सामाजिक अंतर, हाताची स्वच्छता व मास्कचा वापर ही त्रिसुत्री अत्यंत आवश्‍यक असल्याचे या तज्ञांचे मत आहे.

शंभर टक्के लसीकरण ही गरज आहे. राज्यात दोन्ही डोस घेतलेल्या नागरीकांची संख्या जवळपास पन्नास टक्के असून लसीकरणाची गती वाढविण्याची आवश्‍यकता असल्याने सांगण्यात येत आहे.डिसेंबरअखेर पहिला डोस शंभर टक्के नागरीकांना देण्याचे टार्गेट राज्य सरकारने पूर्ण केले तर कोरोनाचा धोका बऱ्यापैकी कमी होईल, असे या तज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT