MP Shrirang Barne & CM Eknath Shinde Latest News  Sarkarnama
पुणे

आमदारांना 50 कोटींची तर खासदारांना किती कोटींची ऑफर होती?; बारणेंनी स्पष्टच सांगितलं

Shrirang Barne|Shivsena|Eknath Shinde : मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी 'सरकारनामा'ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.

विष्णू सानप

पुणे : शिवसेनेसोबत बंडखोरी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात गेलेल्या शिवसेनेच्या (Shivsena) बारा खासदारांपैकी मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) हे बंड केल्यावर प्रथमच शुक्रवारी (ता.22 जुलै) आपल्या मतदारसंघात आले आहेत. यावेळी त्यांनी आपण बंड का केलं आणि पुढील त्यांची राजकीय वाटचाल कशी असेल याबाबत 'सरकारनामा'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं. याबरोबरच शिंदे गटात गेलेल्या आमदारांना 50 कोटींची ऑफर होती तर खासदारांनी किती कोटीची ऑफर होती या प्रश्नालाही सडेतोड उत्तर दिल आहे. (MP Shrirang Barne & CM Eknath Shinde Latest News)

मुलाखती दरम्यान 'सरकारनामा' प्रतिनिधीने बारणे यांना शिंदे गटात गेलेल्या आमदारांना 50 कोटींची ऑफर असल्याची चर्चा होती तर खासदारांना किती कोटींची ऑफर होती?, असा थेट सवाल विचारला. यावर बारणे उत्तर देतांना म्हणाले की, मीडियात राजकारणावर अशा चर्चा होत असतात. मात्र 51 आमदार आणि सुमारे 12 ते 14 खासदार आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते हे पक्ष सोडून जातात ही त्याच्या मनातली खदखद होती. बाळासाहेबांनी ज्या विचाराने शिवसेना निर्माण केली त्या विचाराला बाधा निर्माण करण्याचं काम महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कडून झालं होते म्हणून अनेक आमदार, खासदार आणि शिवसैनिक नाराज होते. आम्ही जेव्हा शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने बाहेर पडलो तेव्हा जनमानसांमध्ये मोठी नाराजी होती. याच नाराजीतून जे घडल्याचे बारणेंनी सांगितले.

आपण शिवसेना का सोडली? या प्रश्नावर बोलतांना बारणे म्हणाले, जे घडत होतं त्या सगळ्या घडामोडीमध्ये मी शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबत होतो. मात्र, ज्यावेळी खासदारांची बैठक झाली त्यावेळी मी ठाकरे यांना सांगितलं की, या परिस्थितीतून आपल्याला जर बाहेर पडायचं असेल तर आपल्याला महाविकास आघाडीतून बाहेर पडावे लागेल आणि भाजप सोबत जायला पाहिजे. तसेच यासाठी सर्वांशी चर्चा केली पाहिजे. मात्र ते राष्ट्रवादी आणि आघाडीतून बाहेर पडायला तयार नसल्याने मतदारसंघ आणि सर्व विचार करून मी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

आपण पुढचा मावळचा उमेदवार मीच असणार असे जाहीर केलं मात्र चिन्ह कुठलं असणार?, या प्रश्नावर बोलतांना बारणे म्हणाले की, येणाऱ्या परिस्थितीवर हे सर्व ठरवलं जाईल. मात्र या घडामोडीवर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आणि मुख्यमंत्री शिंदे यांनी ठरवलं की, ज्या-त्या मतदारसंघांच्या उमेदवाराच्या सोयीनुसार त्यावेळी विचार केला जाईल. तसेच तुम्ही स्थानिक आमदार महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप यांच्याशी जुळवून घेणार का? यावर ते म्हणाले की, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आणि नेत्यांनी माझ्या प्रचारात भाग घेतला होता. त्यामुळे मी 2019 लाच त्यांच्याशी जुळवून घेतले आहे. त्यामुळे आता जुळवण्याचा संबंधच येत नाही, असेही बारणेंनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT