Pune Police : Sarkarnama
पुणे

Pune Police : ५६ काडतुसे, १२ बोअरच्या बंदुका अन् रोकड; आठजण पोलिसांच्या ताब्यात

Crime News : जुलै महिन्यात वानवडी पोलिसांनी रामटेकडी परिसरात संतोष शुक्ला यास ताब्यात घेतले होते.

सरकारनामा ब्यूरो

Pune Police : पुण्यातील हडपसर येथे काही दिवसांपूर्वी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले होते. त्यांचे दहशतवादी कनेक्शन समोर आल्यानंतर एकच खळबळ माजली होती. यानंतर त्यांच्याशी संबंधित अनेकांना पोलिसांनी अटकही केली. ही घटना काहीशी ताजी असतानाच आता पुण्यात पुन्हा आठ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-कश्मीरमधून बनावट शस्त्र परवाना मिळवून सुरक्षारक्षक म्हणून काम करताना हे सर्वजण आढळून आले. या सर्वांकडून देशी बनावटीची पिस्तूल, बोअरच्या १२ बंदुका, ५६ जिवंत काडतुसे, तीन बनावट शस्त्र परवाने असा सहा लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Pune Crime News) संतोष जैनाथ शुक्ला, रामप्रसाद बुद्धा पासवान, राजेश बबलू पासवान, दिनेश जगदीश पासवान, इम्रान मोहमद जिमी खान, मोहंमद बिलाल मोहंमद निसार, साहिलकुमार चमनलाल शर्मा आणि गीतम देशराय शर्मा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

जुलै महिन्यात वानवडी पोलिसांनी रामटेकडी परिसरात संतोष शुक्ला यास ताब्यात घेतले होते. चौकशी केल्यानंतर त्याच्या साथीदारांकडे शस्त्रे असल्याची माहिती त्याने दिली. तसेच, त्यांच्याकडे शस्त्राचा परवाना असल्याचेही त्याने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तळेगाव दाभाडे परिसरातील टोल नाक्यावर काम करणाऱ्या त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता, या सर्वांनी शस्त्र परवान्यावर जम्मू-काश्मीरमधील जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांची खोटी स्वाक्षरी केल्याचेही उघडकीस आले. या सर्व प्रकरणाचा वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पटारे तपास करत आहेत.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT