Gram Panchayat Election
Gram Panchayat Election Sarkarnama
पुणे

Gram Panchayat Election : या कारणांमुळे चुरस वाढली; पुण्यात सरपंचपदासाठी १०५०, तर सदस्यासाठी ५१०७ अर्ज

संतोष आटोळे

इंदापूर (जि. पुणे) : पुणे (Pune) जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींच्या (Grampanchyat) सार्वत्रिक निवडणुकीसाठी (Election) अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सरपंचपदासाठी १०५० अर्ज तर सदस्य पदासाठी ५१०७ अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यास परवानगी दिल्याने अनेकांची गैरसोय दूर झाली. सरपंचाची (Sarpanch) थेट जनतेतून निवड होणार असल्याने चुरस मोठ्या प्रमाणात वाढली आहे. (6157 applications for 221 gram panchayats in Pune district)

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अगोदर ग्रामपंचायत निवडणुका होत असल्याने त्याला मोठे महत्व आले आहे. पुणे जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतीचे सरपंचपद आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या १८६३ जागांसाठी निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी २८ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली, तर २ डिसेंबर रोजी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख होती. या कालावधीत सरपंच पदासाठी १०५०, तर सदस्य पदासाठी ५१०७ अर्ज दाखल झाले आहेत.

ता. १८ डिसेंबरला मतदान

उमेदवारी अर्जाची छाननी पाच डिसेंबरला होणार आहे, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख सात डिसेंबर आहे, त्यामुळे सात तारखेनंतरच निवडणुकीचे खरे चित्र समोर येणार आहे. ज्या ठिकाणी एका जागेसाठी जास्त अर्ज आले आहेत, अशा ठिकाणी १८ डिसेंबरला मतदान होणार आहे. मतमोजणी २० डिसेंबर रोजी तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे.

ग्रामपंचायतची निवडणूक राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढविली जात नाही. मात्र स्थानिक पातळीवर पॅनेल तयार करून या निवडणुका राजकीय पक्षांच्या नेतृत्वात लढविल्या जातात. त्यातच थेट जनतेतून सरपंचाची निवड आहे, त्यामुळे या निवडणुकीला अधिक महत्व प्राप्त झाल्याने ग्रामीण भागात राजकिय वातावरण चांगलेच तापले आहे.

  • तालुका.... सरपंच... पदासाठी अर्ज..... सदस्य संख्या, सदस्यांसाठीअर्ज

  • वेल्हे .....28 .......99............... 196................. 284

  • भोर .... 54...... 160............ 382 ................ 582

  • दौंड.......8......... 48............ 78.................. 268

  • बारामती .... 13 ...... 108...... 137................ 598

  • इंदापूर........ 26 ...... 161...... 246............... 956

  • जुन्नर ........ 17........ 71....... 140 ............. 334

  • आंबेगाव......21....... 98 ....... 201............ 511

  • खेड..........23....... 131....... 193............ 601

  • शिरुर........ 4......... 34.......... 40............ 215

  • मावळ...... 9 ........ 51 ......... 81 ............ 225

  • मुळशी..... 11........ 38.......... 88 ............ 145

  • हवेली....... 7 ........ 51 ......... 81 ........... 388

  • एकूण ...... 221 ......... 1050 ................. 5107

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT