Gram Panchayat Election : सोलापूर जिल्ह्यात सरपंचपदासाठी १०६८, तर सदस्यासाठी ५८७९ अर्ज दाखल

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांपूर्वी ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत, त्यामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुका म्हणजे झेडपी, पंचायत समिती निवडणुकीची लिट्‌मस टेस्ट समजली जात आहे.
Gram Panchayat election
Gram Panchayat electionsarkarnama

सोलापूर : सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींच्या (Gram Panchayat) सार्वत्रिक निवडणुकीसाठी (Election) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवारी (ता. २ डिसेंबर) अंतिम दिवस होता. थेट जनतेतून सरपंच (Sarpanch) निवड असल्याने सरपंचपदासाठी १०६८, तर ग्रामपंचायत सदस्यांसाठी ५८७९ अर्ज दाखले झाले आहेत. सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यासाठी अर्ज मोठ्या प्रमाणात दाखल झाले असले तरी माघारीनंतर चित्र स्पष्ट होणार आहे. (Gram Panchayat Election : 1068 applications filed for post of Sarpanch, 5879 for members in Solapur district)

सोलापूर जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींमधील ६४६ वॉर्डांसाठी ही निवडणूक प्रक्रिया असणार आहे. दाखल अर्जांची छाननी सोमवारी (ता. ५ डिसेंबर) सकाळी ११ पासून सुरू होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी बुधवारी (ता. ७) दुपारी तीनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. निवडणूक चिन्हांचे वाटप व निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी बुधवारीच दुपारी तीन वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे.

Gram Panchayat election
Maharashtra-Karnataka Border Dispute : मी बेळगावला जाणारच; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना चंद्रकांतदादांनी ठणकावले

जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींसाठी ता. १८ डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होणार आहे. निवडणुकीचा निकाल ता. २० डिसेंबर जाहीर होणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांपूर्वी ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत, त्यामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुका म्हणजे झेडपी, पंचायत समिती निवडणुकीची लिट्‌मस टेस्ट समजली जात आहे. सरपंचांची निवड जनतेतून होत असल्याने या निवडणुकांमध्ये अधिक चुरस निर्माण झाली आहे.

Gram Panchayat election
Solapur Lok Sabha : लोकसभेसाठी कपिल पाटील सोलापूर भाजपचे नवे ‘कॅप्टन’ : उमेदवार निवडीपासून ही आहेत तगडी आव्हाने
Summary
  • तालुका - ग्रामपंचायती - सरपंचासाठी अर्ज - सदस्यासाठी अर्ज

  • करमाळा...........३०.............१३५ .................... ६२५

  • माढा ................. ८ .............. ३६ ..................... ३१२

  • बार्शी .................२२ .............. ११० ................... ४८२

  • उत्तर सोलापूर ..... १२ ................ ७८ ................... ४७०

  • मोहोळ ................१०.................. ५७ ................... २८५

  • पंढरपूर ................ ११ ................. ६१ .................... ४२३

  • माळशिरस .............३५ ................ १९८ .................. १३०२

  • सांगोला ..................६ ................... ४५ ...................... २६५

  • मंगळवेढा................१८ ................... ११८ ..................... ६२६

  • दक्षिण सोलापूर ........ १७ .................. १२१ ..................... ६३७

  • अक्कलकोट ............. २० .................. १०९ ..................... ४५२

  • एकूण ....................... १८९ ................ १०६८ .................. ५८७९

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com