PMC Pune
PMC Pune Sarkarnama
पुणे

पुणे पालिकेत 87 जागा महिलांसाठी ; अनेकांचे राजकीय भवितव्य घडणार किंवा बिघडणार

ब्रिजमोहन पाटील

पुणे : राज्य निवडणूक आयोगाने (Maharashtra election commission) मुंबईसह 14 महापालिकांतील निवडणुकांसाठी पावले टाकण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर आता ३१ मे रोजी ५० टक्के महिला आरक्षणासाठी सोडत काढली जाणार आहे. तीन सदस्यांचा एक प्रभाग असल्याने २९ प्रभागांमध्ये दोन जागा या महिलांसाठी आरक्षित असणार आहेत. त्यामुळे अनेकांचे भविष्य टांगणीला लागेल आहे. (Local bodies election 2022 Maharashtra)

पुणे महापालिकेच्या (Pune corporation election 2022) निवडणुकीत तीन सदस्यांचा एक प्रभाग आहे. ५८ प्रभागांपैकी ५७ प्रभागात तीन सदस्य आहेत. तर एका प्रभागात दोन सदस्य आहेत. १७३ जागांपैकी 87 जागा या महिलांसाठी आरक्षीत आहेत. यामध्ये १२ जागा अनुसूचित जातीसाठी आणि ए जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने १३ मे रोजी पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर केली. त्यामध्ये प्रारूप प्रभाग रचनेतील ३२ प्रभागांमध्ये बदल झालेले आहे. त्यामुळे अनेक प्रभागांमधील राजकीय गणित बदलले आहेत.

त्यानंतर २०११ च्या लोकसंख्येला आधार माणून अनुसूचित जाती व जमातीचे आरक्षण असलेले २५ प्रभाग कोणते याचीही यादी संकेतस्थळावर जाहीर केली. मात्र, महिलांचे आरक्षण कधी जाहीर होणार याबाबत स्पष्टता नव्हती. राज्य निवडणूक आयोगाने महिला आरक्षणाची सोडत जाहीर करण्याचे वेळापत्रक आज (ता. २३) जाहीर केले असून, त्याचे पत्र पुणे महापालिकेला मिळाले आहे.

आकडे बोलतात

- एकूण प्रभाग ५८

- एकूण सदस्य - १७३

- महिलांसाठी आरक्षीत - ८७

- तीन पैकी जागा दोन महिलांसाठी आरक्षीत असेलेल प्रभाग - २९

असा असेल सोडतीचा कार्यक्रम

- २७ मे - सोडत काढण्यासाठी प्रसार माध्यमांद्वारे नागरिकांना माहिती देणे

- ३१ मे - अनुसूचित जाती, जमाती, व सर्वसाधारण महिला यांच्या आरक्षित जागा निश्‍चीत काढण्यासाठी सोडत काढणे

- १ जून - सोडतीनंतर प्रभाग निहाय आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करणे

- १जून ते ६ जून - प्रभागनिहाय आरक्षणावर हरकती व सूचना मागविणे

- १३ जून - प्रभाग निहाय हरकती व सूचनांवर विचार करून अंतिम आरक्षण परिशिष्ट - ड मधील नमुन्यात राजपत्रात सादर करणे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT