Singhgad Police Fir
Singhgad Police Fir  pune reporter
पुणे

९३ कोटींची फसवणूक, आमदार मकरंद पाटलांच्या दोन्ही पुतण्यांचा पोलिसांना शोध

सरकारनांमा ब्यूरो

पुणे : उत्कर्ष कॉन्स्ट्रोवेल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक उत्कर्ष मिलिंद पाटील व अव्दैत मिलिंद पाटील यांनी कंपनीच्या माध्यमातून उत्तर प्रदेशात मनरेगा योजनेच्या बोगस धनादेशाव्दारे ९२.९९ कोटी रूपये काढण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी पुण्यातील सिंहगड पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतच्या गुन्ह्याची नोंद करणारे सहाय्यक पोलिस निरीक्षक सलगर यांची बदली झाल्यानंतर पुणे पोलिसांनी गेल्या चार महिन्यांत या प्रकरणाकडे का दूर्लक्ष केले, तसेच यातील संबंधितांना ताब्यात का घेतले नाही, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

सिंहगड पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार, उत्कर्ष कॉन्स्ट्रोवेल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी रस्ते आणि मेट्रो ट्रॅक बनविण्याचे काम करते. त्यांचे एचडीएफसी बँकेत खाते आहे. त्यांनी ९२.९९ कोटी रूपये काढण्यासाठी लखनौ येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जवाहर भवन शाखेचा मनरेगा योजनेचा धनादेश सादर केला होता. एचडीएफसी बँकेच्या अधिकाऱ्यांना या धनादेशाविषयी संशय आल्याने त्यांनी धनादेशाची स्कॅन केलेली प्रत लखनौ शाखेतील समकक्षांना पाठवली.

एचडीएफसी बँकेच्या अधिकाऱ्यांनी स्टेट बँकेत जाऊन चौकशी केली असता तो बनावट असल्याचे आढळून आले. असा कोणताही धनादेश देण्यात आलेला नसल्याने यानंतर एचडीएफसी बँकेने सिंहगड पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी उत्कर्ष कॉन्स्ट्रोवेल आणि प्रताप पाटील, दत्तात्रेय कारमपुरी यांच्यावर ४२०, ४६५, ४६७,५११,४७१,३४ कलमान्वये गुन्हा नोंद केला असून पुणे पोलिस संबंधितांवर कारवाई करण्यासाठी त्यांचा शोध घेत आहेत.

एचडीएफसी बँकेचे शाखा व्यवस्थापक अश्विन मुकुंद यांनी नर्हे येथील उत्कर्ष कॉन्स्ट्रोवेल प्रा. लि. कंपनी, हडपसर येथील प्रताप अण्णाराव पाटील (वय ३६), दत्तात्रेय कारमपुरी आणि इतरांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. उत्कर्ष कॉन्स्ट्रोवेल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही उत्कर्ष मिलिंद पाटील आणि अद्वैत मिलिंद पाटील यांच्या मालकीची म्हणजे ते या कंपनीचे डायरेक्टर आणि सिगनेचर अथोरीटी असल्यामुळे पुणे पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT