पुणे : भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांच्या विरोधात पुणे सायबर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची बदनामा केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Political news)
नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधींना इडीने चौकशीसाठी बोलावल्यानंतर त्यांना कोरोना झाल्याचे कॉंग्रेस पक्षाकडून सांगण्यात आले होते. यावर अतुल भातखळकर यांनी ट्विटर हा कोरोनाचा इडी व्हेरिएंट असल्याचं म्हटलं होतं. याबाबत पुण्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर अतुल भातखळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कॉंग्रेसचे संदीप भुजबळ यांनी अतुल भातखळकर यांच्याविरोधात तक्रार दिली होती. भातखळकर यांनी केलेल्या ट्वीटनंतर काँग्रेस नेत्यांकडूनही त्यांच्यावर टीका झाली.त्यानंतर आता अतुल पुणे पोलिसांनी वादग्रस्त पोस्टप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे त्यांची चौकशीही केली जाण्याची शक्यता आहे. भातखळकर यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नॅशनल हेराल्डप्रकरणी सोनिया गांधीना जुलै महिन्यात ईडीने चौकशीसाठी बोलवले होते. त्याचदरम्यान त्यांना कोरोना संसर्ग झाल्यामुळे चौकशीस हजर राहता आले नाही. त्यावरूनच भातखळकर यांनी सोनिया गांधींबाबत ‘कोरोनाचा ईडी व्हेरीयंट’ असे ट्विट भातखळकर यांनी टीका केली होती.
दरम्यान भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनीही राहुल गांधी आणि सोनिया गांधीवर टीका केली होती. ''हा देश संविधानावर चालतो. राहुल आणि सोनिया गांधी हे कायद्याच्या वर नाहीत. दोघेही जामिनावर बाहेर आहेत. तुम्हाला कोर्टात जामीन मिळाला आहे आणि त्या जामीनावरुनच तुम्हाला आरोपी मानले जात असते. ही राजकीय द्वेषाची बाब असल्याचे सांगत तुम्ही दिल्ली उच्च न्यायालयात गेलात. पण दिल्ली उच्च न्यायालयाने हे प्रकरण रद्द केले जाणार नसल्याचे सांगितले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.