Mangaldas Bandal-Dattatray Mandhre Sarkarnama
पुणे

Mangaldas Bandal News : मंगलदास बांदलांना जेलवारी घडविणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यावर गुन्हा दाखल

बांदलांची जेलवारी सुरू झाली, ती अद्यापपर्यंत कायम आहे. दुसरीकडे, मांढरे यांना शिक्रापूर सोसायटीचे अध्यक्षपद देण्यात आल्याची चर्चाही परिसरात रंगली होती.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : पुणे (Pune) जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल (Mangaldas bandal) यांना जेलची वारी घडविणारे शिरूर (Shirur) तालुक्यातील शिक्रापूर सहकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) दत्तात्रय मांढरे यांच्यावर शिक्रापूर पोलिसांनी नुकताच गुन्हा दाखल केला आहे. तहसीलदारांचा आदेश असतानाही मांढरे यांनी स्थानिक शेतकऱ्यांचा रस्ता जेसीबीने उखडून टाकला. त्याबाबत नितीन खेडकर (वय ३८, रा. शिक्रापूर, ता. शिरूर) यांच्या तक्रारीनंतर दत्तात्रेय मांढरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. (A case has been registered against NCP's Dattatray Mandhre)

राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रेय मांढरे यांच्या तक्रारीवरूनच माजी सभापती मंगलदास बांदल यांना जेलची हवा खावी लागली आहे. तेच मांढरे सध्या अडचणीत आले आहेत. शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्रापुरातील शेतकरी दिलीप खेडकर यांची शेती नितीन खेडकर यांनी काही दिवसांपूर्वी विकत घेतली. त्या शेताला जाण्यासाठी चासकमान कालव्याच्या कोरेगाव-धानोरे शाखा कालव्याची वितरिका नं.३ वरुन पाटबंधारे खात्याचा रस्ता आहे.

शिक्रापूर विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष दत्तात्रय मांढरे यांनी तो रस्ता अडविल्याने नितीन खेडकर यांनी शिरूर तहसीलदारांकडे तक्रार केली. त्या तक्रारीनुसार तहसीलदारांच्या आदेशाने मंडलाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या बंदोबस्तात रस्ता खुला करुन दिला. त्यानंतर दोनच दिवसांत मांढरे यांनी संबंधित रस्ता जेसीबीच्या साहाय्याने पुन्हा खोदला व खेडकर यांच्यासह स्थानिक शेतकऱ्यांचा रस्ता अडविला. त्यावरून खेडकर यांनी पुन्हा तहसीलदारांकडे अर्ज केल्याने मंडलाधिकाऱ्यांनी खोदलेल्या रस्त्याचा पंचनामा केला.

दरम्यान, नितीन खेडकर यांनी पोलिसांकडे तक्रार करताच शिक्रापूर विविध कार्यकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष दत्तात्रय मांढरे व बाळासाहेब मांढरे (दोघे रा. शिक्रापूर) यांच्याविरुद्ध रस्त्याला अडथळा व तहसीलदारांचा आदेश डावलून रस्ता खोदल्याचा गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली. पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बापू हडागळे तपास करत आहेत.

बांदल जेलमध्ये तर मांढरे झाले अध्यक्ष...

खरं तर मंगलदास बांदल आणि दत्तात्रय मांढरे हे दोघेही जिवलग मित्र म्हणून शिक्रापूर परिसरात परिचित आहेत. मात्र, एप्रिल २०२१ मध्ये मांढरे यांनी माजी सभापती मंगलदास बांदल यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली. त्यांच्यावर फसवणुकीच्या प्रकरणात शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेच्या गैरव्यवहाराचाही संबंध आला. त्यानंतर बांदलांची जेलवारी सुरू झाली, ती अद्यापपर्यंत कायम आहे. त्यांना जामीनही मिळू शकलेला नाही. दुसरीकडे, मांढरे यांना शिक्रापूर सोसायटीचे अध्यक्षपद देण्यात आल्याची चर्चाही परिसरात रंगली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT