Sharad Pawar Sarkarnama
पुणे

Sharad Pawar News : मंचरमधील चिमुकला व आजीचा थेट शरद पवारांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद; 'पवार बाबा की जय' : व्हिडीओ व्हायरल

Sharad Pawar Viral video news : प्रथमच पवार साहेबांनी आंबेगाव तालुक्यात संपर्क केल्याने या व्हिडीओची जोरदार चर्चा सुरु आहे.

डी. के वळसे पाटील

Muncher News : व्हिडिओ कॉलवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते शरद पवार यांना पाहताच 'पवार बाबा की जय' असे तीन वर्षाचा चिमुकला देवांश सुरेश निघोट म्हणताच पवार यांच्यासह खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनाही स्मितहास्य करून चिमुकल्याला व त्याच्या आजीला दाद दिल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

राजकीय भूकंपानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांची साथ सोडून कँबीनेट मंत्री पदाची शपथ दिलीप वळसे पाटील यांनी घेतली. या पार्श्वभूमीवर प्रथमच पवार साहेबांनी आंबेगाव तालुक्यात संपर्क केल्याने या व्हिडीओची जोरदार चर्चा सुरु आहे. निघोटवाडी-मंचर (ता. आंबेगाव) येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक कार्यकर्ते सुरेश उर्फ अण्णा निघोट हे डॉ. अमोल कोल्हे यांचे सोशल मिडिया प्रमुख म्हणून आंबेगाव तालुक्यात काम करतात. त्यांनी शनिवारी (ता.८) दुपारी डॉ. कोल्हे यांना मोबाईलद्वारे संपर्क केला होता.

त्यावेळी डॉ. कोल्हे नाशिक दौऱ्यात पवारयांच्या बरोबर होते. डॉ. कोल्हे म्हणाले ''माझ्याबरोबर पवार साहेब आहेत. त्यावेळी निघोट म्हणाले माझ्या आईला पवार साहेबांबरोबर बोलायचे आहे. थोड्या वेळाने काँल करतो. असे डॉ. कोल्हे यांनी सांगितले. दोन मिनिटातच व्हिडीओ कॉल आला. डॉ. कोल्हे म्हणाले म्हणाले अण्णा नमस्कार, पवार साहेब बोलतात. साहेबांना पाहून सुरेश यांच्या आई ताराबाई हरिभाऊ निघोट (वय ६५) भारावून गेल्या.

हात उंचावून ताराबाई म्हणाल्या 'हँलो पवार साहेब नमस्कार, पवार म्हणाले 'नमस्कार काय म्हणतो आंबेगाव तालुका' ताराबाई म्हणाल्या 'आम्ही आहोत तुमच्या बरोबर. घाबरू नका.' पवार म्हणाले 'कायम, आजच नाही अनेक वर्ष.' ताराबाई म्हणाल्या 'हो कायमच' पवार म्हणाले, सगळ व्यवस्थित आहे काळजी करू नका. ताराबाई म्हणाल्या 'आमचाही व्यवस्थित आहे लोकांचा पाठींबा पवार साहेबांलाच' हा संवाद पाहून तीन वर्षाचा चिमुकला देवांश सुरेश निघोट म्हणाला 'पवार बाबा की जय' त्याचाही पाठींबा पाहून पवार साहेब भारावून गेले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT