Vasant More, Ajit Pawar News Sarkarnama
पुणे

Vasant More News : वसंत मोरेंची थेट अजितदादांकडे मागणी; 'जरा आता आमचाही विचार करा की'

Pune News : वसंत मोरे यांच्या पोस्टची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे

सरकारनामा ब्यूरो

Ajit Pawar News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी केलेल्या फेसबुकची एकच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मोरे यांनी उपमुख्ममंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे 'जरा आता आमचाही विचार करा की, अशी मागणी केली आहे.

वसंत मोरे यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. ते आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले, ''होय दादा एक विनंती करू का? 2021 मध्ये तुम्ही उपुख्यमंत्री असताना तुम्ही आणि तुमच्या पूर्वीच्या महविकास आघाडी सरकारने प्रचंड कष्ट करून पुणे महानगरपालिकेची 3 नगरसेवकांची प्रभाग रचना केली होती. जी आजही कायम आहे अगदी अगदी आरक्षणाची सोडत ही पूर्ण झालेली आहे.

निवडणुका तुम्ही घेणारच होता पण सारे केलेले कष्ट वाया गेले. राज्यात सत्ता बदल झाला आता परत तुमच्या धाडसी निर्णयामुळे तुमच्या कार्यकुशल नेतृत्वामुळे तुम्ही पुन्हा एकदा सत्तेत आलात. पुन्हा तुमचा राज्याभिषेक ही झालाय मनासारखे खाते ही मिळाले आहे. जरा आता आमचाही विचार करा की दादा घ्या की महानगरपालिकेच्या निवडणुका,'' अशी मागणी मोरे यांनी केली आहे.

दरम्यान, राज्यामध्ये अनेक दिवसांपासून महानगरपालिकेच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. महानगरपालिकेमध्ये प्रशासक राज आहे. त्यामुळे मोरे यांनी अजित पवार यांना निवडणुका घेण्याची विनंती केली आहे. 2017 च्या महापालिका निवडणुकीमध्ये भाजपने (BJP) चारची प्रभाग रचणा केली होती. त्याचा भाजपला निवडणुकीमध्ये चांगलाच फायदा झाला होता.

हीच गोष्ट लक्षात घेऊन महाविकास आघाडी सरकारने 2021 मध्ये पालिकेचे प्रभाग रचणा पुन्हा तीनची केली. त्यामुळे आपल्याला निवडणुकीत फायदा होईल, असा आघाडीचा कायास होता. मात्र, दरम्यानच्या काळात आघाडी सरकार पडले. त्यामुळे वसंत मोरे यांनी अजित पवार यांना आता महापालिकेच्या निवडणुका घेण्याची विनंती केली आहे.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT