Jalgaon Politics : भाजप आमदार मंगेश चव्हाणांविरुद्ध खडसेंनी दाखल केला अब्रुनुकसानीचा दावा

Mangesh Chavan news : या आधी एकनाथ खडसे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरुद्धही अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता
Eknath Khadse, Mangesh Chavan News
Eknath Khadse, Mangesh Chavan NewsSarkarnama
Published on
Updated on

Eknath Khadse News : भारतीय जनता पक्षाचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या विरूध्द माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) आमदार एकनाथ खडसे यांनी अब्रुनुकसानीचा दावा न्यायालयात दाखल केला आहे. त्यात आज एकनाथ खडसे यांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत.

भाजपचे (BJP) आमदार मंगेश चव्हाण यांनी प्रसार माध्यमाना दिलेल्या मुलखतीत खडसे यांना बदनामीकारक शब्द वापरले, असे या याचिकेत म्हटले आहे. यात खडसे यांचा काहीही संबध नसतांना हे शब्द वापरून त्यांची बदनामी व अब्रनुकसानी केल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी भारतीय दंड विधान ४९९, ५०० माहिती आणि तंत्रज्ञान कायदा ६६ अ प्रमाणे फौजदारी व अब्रनुकसानीचा दावा खडसे यांनी दाखल केला.

Eknath Khadse, Mangesh Chavan News
Satara APMC News : खासदार उदयनराजेंना धक्का; खिंडवाडी येथील जागेचा निकाल बाजार समितीच्या बाजूने...

या प्रकरणी जळगाव (Jalgaon) जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश आर. वाय. खंदारे यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यात खडसे यांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. खडसे यांच्यातर्फे ॲड. अतुल सूर्यवंशी हे काम पाहत आहेत. खडसे यांनी यापूर्वीही शिवसेना (शिंदे गट) नेते व राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरूध्द अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता.

Eknath Khadse, Mangesh Chavan News
Anil Deshmukh slams Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंसाठी ही धोक्याची घंटा ? ; खातेवाटपावरुन अनिल देशमुखांचा टोला

मात्र, या प्रकरणी जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू असतांना पाटील यांनी माफी मागितल्यास आपण खटला मागे घेण्यास तयार आहोत, असे खडसे यांनी म्हटले होते. त्यावर मंत्री पाटील म्हणाले होते, एकनाथ खडसे (Eknath Khadse) जेष्ठ नेते आहेत, त्यांनी आपल्या घरी चहा पिण्यासाठी यावे. त्यानंतर खडसे यांनी अब्रुनुकसानीचा दावा मागे घेतला होता. खडसे यांनी चव्हाण यांच्यावर दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्यात पुढे काय होणार याकडेच आता जनतेचे लक्ष आहे.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com