Pimpri-Chinchwad Sarkarnama
पुणे

Manish Sisodia Arrest : 'जेल के ताले टूटेंगे मनीष सिसोदिया छूटेंगे'; सिसोदियांच्या अटकेनंतर 'आप' आक्रमक

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : 'आप'चे नेते दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना उत्पादन शुल्क गैरव्यवहारप्रकरणी 'सीबीआय'ने रविवारी (ता.२६) अटक केल्यानंतर या पक्षाने सोमवारी (ता.२७) देशभर तीव्र निदर्शने केली. पिंपरी-चिंचवडही त्याला अपवाद राहिले नाही.

सोमवारी सायंकाळी 'आप'ने पिंपरी चिंचवड प्रभारी व राज्य उपाध्यक्ष हरीभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली निगडीत टिळक चौकात तीव्र आंदोलन केले. भाजपकडून सूडबुद्धीने संविधानिक यंत्रणांचा गैरवापर करण्यात येत असल्याचा आरोप राठोड यांनी यावेळी केला.

दिल्लीतील आप सरकारने सामान्य जनतेच्या कल्याणासाठी सुरू केलेल्या प्रत्येक कामाला आडकाठी आणून त्रास देणारी भाजप खोट्यानाट्या गुन्ह्यामध्ये आपच्या नेत्यांना अडकवून जेलमध्ये टाकत आहे, आत्ताही दिल्लीच्या शिक्षणातील क्रांतीची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली असताना सूडबुद्धीने पेटलेल्या भाजपने सिसोदियांना अटक केली आहे.

परंतू, ते यातून सहिसलामत सुटून येतील, असा विश्वास राठोड यांनी व्यक्त केला. 'जेल के ताले टूटेंगे मनीष सिसोदिया छूटेंगे', 'केंद्र सरकारचा पोपट हा, लागला मिटू मिटू बोलायला' ED, CBI च्या चुकीच्या कारवाया टळू दे, आप ले राज्य येऊ दे', 'मोदी केजरीवाल से डरता हे, CBI को आगे करता है', अशा जोरदार घोषणा आंदोलक यावेळी देत होते.

भाजपाने देशभरात राबवलेल्या अघोषित आणीबाणीचा समाचार 'आप'चे पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी यावेळी घेतला.

मोदी आणि शहा हे विरोधकांना नाहक त्रास देण्यासाठी त्यांना ईडी, सीबीआय, प्राप्तीकर विभागाकडून सातत्याने खोट्या प्रकरणामध्ये अडकवून छळ करत आहे.

अशा लोकशाहीची लक्तरे वेशीवर टांगणाऱ्या भाजप सरकारला सडक ते संसदपर्यंत जन-चळवळ उभी करुन विरोध केला जाईल, असे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT