Shivsena News : पक्ष फुटला पण अक्कलदाढ फुटली नाही, खैरेंना जिल्हाप्रमुखाचा टोला..

Chandrakant Khaire : खैरेंनी अमित शहा यांचे नाव घेवून केलेली टीका जंजाळ यांच्या जिव्हारी लागली
Chnadrakant Khaire- Rajendra janjal News, Sambhajinagar
Chnadrakant Khaire- Rajendra janjal News, SambhajinagarSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Smbhajinagar : विदर्भाच्या दौऱ्यावर असलेले ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Saha) यांच्यावर टीका केली होती. ईव्हीएम मशीन सॅटलाईटद्वारे हॅक करून भाजप निवडणुका जिंकते असा त्यांच्या टीकेचा रोख होता. त्यामुळेच अमित शहा महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागा जिंकण्याचा दावा करत आहेत, असा आरोप देखील खैरे यांनी केला होता.

Chnadrakant Khaire- Rajendra janjal News, Sambhajinagar
Chandrakant Khaire News : खैरेंचा विदर्भ दौरा जोरात, बावनकुळे, अमित शहांवर हल्लाबोल..

अमित शहा यांच्यावर केलेली टीका (Shivsena) शिवसेनेला झोंबली, यावरून छत्रपती संभाजीनगरचे शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी थेट खैरेंची अक्कलदाढच काढली. जंजाळ यांनी सोशल मडियाच्या माध्यमातून (Chandrakant Khaire) खैरेंवर टीका करतांना मातीचे तोंड असते तर फुटले असते, पक्ष फुटला, माणसं फुटली पण यांना अजून अक्कलदाढ फुटली नाही, अशा शब्दात जंजाळ यांनी खैरेंवर निशाना साधला आहे.

नाव चंद्र (कांत) असल्यामुळे त्यांनी अकलेचे तारे तोडू नयेत, असा टोला देखील जंजाळ यांनी लगावला. राजेंद्र जंजाळ आणि चंद्रकांत खैरे यांच्यामध्ये शिवसेनाफुटीच्या आधीपासून मतभेद होते. जंजाळ युवासेनेचे पदाधिकारी असतांना मुलासाठी खैरेंनी माझ्यावर अन्याय केला असा आरोप करायचे. यावरून खैरे-जंजाळ यांच्यात अनेकदा हमरीतुमरी देखील झाली होती.

हातपाय तोडण्याची धमकी देणाऱ्या खैरेंना प्रतिआव्हान देत जंजाळ त्यांच्या घराबाहेर जावून खुर्ची टाकून बसले होते. राज्यात शिंदेंच्या नेतृत्वाखाली बंड झाल्यानंतर जंजाळ हे शिंदे गटासोबत गेले होते. त्यांच्यावर जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. खैरे यांचे चिरंजीव तथा युवासेनेचे पदाधिकारी ऋषीकेश खैरे यांच्यावर मध्यंतरी बदलीसाठी पैसे घेतल्याचा आरोप झाला तेव्हा देखील जंजाळ यांनी खैरे पिता-पुत्रांवर निशाणा साधला होता.

आता शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह अधिकृतपणे शिंदे गटाला मिळाल्यानंतर जंजाळ अधिक आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. राज्याच्या सत्तेत शिवसेना-भाजप युती असल्यामुळे खैरेंनी अमित शहा यांचे नाव घेवून केलेली टीका जंजाळ यांच्या जिव्हारी लागली आणि त्यांनी पलटवार केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com