AAP Andolan Sarkarnama
पुणे

AAP News : ''भरती परीक्षा तयारी करणारे वाऱ्यावर आणि आरक्षणाला चुना हेच महाराष्ट्र सरकारचे धोरण ?''

Employee Recruitment Contract Basis : कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे.

उत्तम कुटे

AAP Andolan News : कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने नुकताच घेतला असून तसा 'जीआर'ही काढला आहे. त्यावर विरोधी पक्षांनी जोरदार हल्लाबोल करीत आंदोलन सुरू केले आहे. आम आदमी पार्टीनेही (AAP) पुण्यात आज (ता.२१) आंदोलन केले. भरती परीक्षेची तयारी करणारे वाऱ्यावर आणि आरक्षणाला चुना हेच या सरकारचे धोरण आहे, असा हल्लाबोल यावेळी त्यांनी केला.

सरकारी कंत्राटी भरती ही मंत्र्यांच्या वशिल्याच्या तट्टूसाठीची असल्याने ती मागे घेण्याची मागणी आपने यावेळी केली. भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थीही या आंदोलनात सहभागी होत मोठा प्रतिसाद दिला. त्यांच्या तोंडाला या नवीन कंत्राटी धोरणामुळे पाने पुसली जाणार आहेत, अशी खंत या वेळी आपच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

कंत्राटी पद्धतीत पगाराच्यासाठ टक्के रक्कम ही प्रत्यक्ष कर्मचाऱ्याला हातात पडणार असून १५ टक्के रक्कम ही नियुक्त करणाऱ्या कंत्राटदाराला मिळणार आहे. त्यामुळे हे कंत्राटदार आणि मंत्र्यांसाठी भ्रष्टाचाराचे आणि वशिल्याच्या भरतीचे कुरण ठरणार आहे, अशी तोफ यावेळी डागण्यात आली. कंत्राटी पद्धतीत स्पर्धा नसल्याने गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार असून वंचित घटकातील मुलांना संधीच मिळणार नाही.

तसेच जनतेप्रती उत्तरदायित्व व जबाबदारी या कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची राहणार नाही, जनतेस सेवा हमी मिळणार नाही. असे आक्षेप आपचे मुकुंद किर्दत यांनी यावेळी घतेले. आपचे सरकार असलेल्या दिल्ली, पंजाबात जुनी पेन्शन योजना लागू केली असताना इकडे महाराष्ट्रात मात्र त्याच्या बरोबर उलटे धोरण भाजप (BJP) -शिवसेना (Shivsena) -राष्ट्रवादी यांचे शिंदे फडणवीस पवार सरकार राबवत आहे असे ते म्हणाले.

या वेळी अनिल कोंढाळकर, सतिश यादव, निलेश वांजळे, अक्षय शिंदे, ॲड अमोल काळे, किरण कद्रे, अमोल मोरे, ज्ञानेश्वर गायकवाड, प्रशांत कांबळे, धनंजय बेनकर, शाशिभूषण होले, अभिजीत गायकवाड, साजिद कुरेशी, इरफान रोड्डे आदी या आंदोलनात सामील झाले होते.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT