Lonavala Police
Lonavala Police  
पुणे

अल्पवयीन मुलीचे ओडिशातून अपहरण; लोणावळ्यात सुखरुप सुटका

दिलीप कांबळे

मावळ : लोणावळा पोलिसांनी ओडिशा (Odisha) राज्यातून अपहरण केलेल्या एका १७ वर्षीय पीडित मुलीची सुटका केल्याची माहिती समोर आली आहे. अपहरणकर्त्यांनी मुलीला मावळ येथील नवलाख उंबरे परिसरातील एका घरात डांबून ठेवले होते. याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हालचाली करत मुलीची सुटका केली. पुणे ग्रामीण पोलीस (Pune Police) अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आल्याची माहिती लोणावळा(Lonavala) ग्रामीण पोलीस निरीक्षक प्रविण मोरे यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी पोलीस निरीक्षक प्रविण मोरे यांना या अपहरण झालेल्या मुलीबद्दल माहिती दिली. ओडिशा येथील सिमुलीया पोलीस ठाण्याच्या परिसरातून अपहरण झालेली १७ वर्षीय पीडित मुलगी नवलाख उंबरे येथील एका खोलीत बंदीस्त आहे. तिला तातडीने मदत करून तिची सुटका करा, असेही त्यांनी प्रविण मोरे यांना सांगितले.

वरिष्ठांच्या आदेशानुसार, प्रविण मोरे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या सहाय्याने पथक तयार केले. मोबाईल टॉवर लोकशेनच्या आधारावर पथकाने नवलाख उंबरे येथे पोहचत तेथील स्थानिक नागरिकांच्या मदतीने पिडीत मुलीचा शोध घेतला. यावेळी एका बंद खोलीत तिला डांबून ठेवण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी मुलीला सुखरूप ताब्यात घेतले. त्यानंतर या प्रकाराबाबत स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये केलेल्या कारवाईबाबच माहिती दिली. पोलिसांनी संबंधित पिडीत मुलीला मोशी येथील चैतन्य महिला आश्रमात ठेवले आहे. तसेच, ओडिशातील संबंधित पोलिस ठाण्यातही याबबात कळविण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT