वडिलांना त्रास होतोय हे बघून सुप्रिया सुळे पुढे सरसावल्या अन्....

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेदेखील लतादीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होत्या.
Supriya Sule- Sharad Pawar
Supriya Sule- Sharad Pawar

मुंबई : गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी रविवारी (६ फेब्रुवारी) जगाचा निरोप घेतला. मुंबईतील (mumbai) ब्रीच कॅन्डी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लतादीदींच्या पार्थिवावर मुंबईतील शिवाजी पार्कवर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) , राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्यासह विविध क्षेत्रातील मंडळीही उपस्थित होती. लता दीदींच्या जाण्याने मुंबईसह संपूर्ण देशावर शोककळा पसरली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेदेखील लतादीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होत्या. अंत्यदर्शनावेळचा त्यांचा एक फोटो, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी भावूक होत बाप आणि लेकीच्या नात्याचं कौतुक करत आहेत. बाप आणि लेकीचा हा जिव्हाळा अनेकांना भावूकही करत आहे.

Supriya Sule- Sharad Pawar
स्वरांचं चांदण शिंपडणाऱ्या गानसम्राज्ञीला साश्रू नयनांनी निरोप...

नक्की काय घडलं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लतादीदींच्या पार्थिवाचं दर्शन घेतले. यानंतर ते खाली येऊन खूर्चीवर बसले. त्यांच्यापाठोपाठ राज्यपाल, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनीही अंत्यदर्शनं घेतले. याचदरम्यान, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनीही लतादीदींच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेत त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी शरद पवार यांनी आपल्या पायातील बूट स्टेजच्या खालीच काढले होते.

अंत्यदर्शन घेतल्यानंतर शरद पवार खुर्चीवर येऊन बसले. यावेळी ते बूट घालण्यासाठी खाली वाकणार इतक्यात सुप्रिया सुळे पुढे सरसावल्या आणि वडिलांच्या पायात बूट घातले. वडीलांना त्रास होतोय हे लक्षात येताच त्यांनी कसलाही विचार करता आपल्या वडीलांच्या पायात बूट घालण्यासाठी त्या लगेचच पुढे सरसावल्या. यावेळी शरद पवार यांच्या बाजूला राज्यपाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ही गोष्ट पाहिली आणि ते ही भारावून गेल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं.

गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. दुपारी त्यांचे पार्थिव रुग्णालयातून त्यांच्या प्रभुकुंज या निवासस्थानी आणण्यात आले होते. याठिकाणी पोलिसांनी त्यांना मानवंदना दिली. शिवाजी पार्क येथे त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासह दिग्गजांनी श्रद्धाजली वाहिली.

Supriya Sule- Sharad Pawar
नितेश राणेंचा कोठडीतील मुक्काम वाढला

या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रसेचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल, उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, क्रिकेटपट्टू सचिन तेंडुलकर, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री जयंत पाटील, छगन भुजबळ, सिनेअभिनेता शाहरुख खान, अमिर खान यांच्यासह लाखो चाहते शिवाजी पार्कवर आपल्या लाडक्या दीदीला अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगेशकर कुटुंबियांचे सांत्वन केले. लष्कर, नौदल आणि हवाई दलातर्फे लतादीदींना शेवटची मानवंदना देण्यात आली. हृदयनाथ मंगेशकर यांनी लतादीदींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. यावेळी उपस्थित लाखो चाहत्यांनी ‘मेरी आवाज ही पहचान हैं’,‘अखेरचा हा तुला दंडवत’,‘ए मेरे वतन के लोगो’ अशी गाणी गात लतादीदींना श्रद्धांजली वाहिली. ‘लता दीदी अमर रहे’अशा घोषणांनी शिवाजी पार्क दुमदुमून गेले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com