Abhay Chhajed Car Accident : काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड यांच्या कारला पुण्यात भीषण अपघात झाला आहे. ते काही कामानिमित्ताने पुण्याच्या दिशेनं येत असताना हा अपघात झाला. या अपघातात अभय छाजेड आणि त्यांचा ड्रायव्हर गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तर सध्या त्यांच्यावर पुना रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अभय छाजेड यांच्या ड्रायव्हरचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे त्यांची कार पुण्यातील पिरंगुट परिसरात एका टेकडीला धडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या अपघातात ड्रायव्हरसह अभय छाजेड गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने पुना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. छाजेड यांची कार नऊच्या सुमारास पिरंगुट परिसरात पोहोचली.
यावेळी अचानक कारवरील चालकाचं नियंत्रण सुटलं त्यामुळे कार अनियंत्रित झाली. चालकाने कारवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या टेकडीवर आदळली.
या अपघातात कारचं मोठं नुकसान झालं, तसंच अभय छाजेड यांना देखील गंभीर दुखापत झाली आहे. या अपघाताची माहिती मिळताच काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलीस पुना हॉस्पिटलमध्ये दाखल झाले असून पोलिसांकडून घटनेची चौकशी सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.