Popat Deshmukh Death : दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या मुलाचे निधन : आमदार बाबासाहेब देशमुख यांना पितृशोक

Popat Ganpatrao Deshmukh passes away : आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या राजकीय प्रवासात व त्यांना आमदार बनविण्यामागे पोपट देशमुख यांचे मोलाचे योगदान असल्याचे मानले जाते. शांत, संयमी व मनमिळावू स्वभावामुळे त्यांना परिसरात विशेष मान होता. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.
Popat Ganpatrao Deshmukh passed away
Popat Ganpatrao Deshmukh, father of MLA Dr. Babasaheb Deshmukh and son of veteran leader Ganpatrao Deshmukh, passed away after a brief illness. Sarkarnama
Published on
Updated on

Sangola News, 12 May : सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे वडील तथा विक्रमवीर आमदार स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे ज्येष्ठ सुपुत्र पोपट गणपतराव देशमुख (वय ६९) यांचे अल्पशा आजाराने सोमवारी (ता. ११) निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते.

पोपट देशमुख हे मूळचे मोहोळ तालुक्यातील पेनूर येथील रहिवासी होते. त्यांचे वडील स्वर्गीय गणपतराव देशमुख हे राज्याच्या राजकारणात दीर्घकाळ सक्रिय राहून विक्रमी अकरा वेळा आमदार म्हणून निवडून आले होते.

मात्र, इतक्या मोठ्या राजकीय वारशाची पार्श्वभूमी असतानाही पोपट देशमुख यांनी कधीही सक्रिय राजकारणात सहभाग नोंदवला नाही. ते साधेपणाने आपल्या मूळ गावी राहून सामाजिक व कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत होते.

Popat Ganpatrao Deshmukh passed away
Subhash Deshmukh : फडणवीसांनंतर अवघ्या 14 व्या दिवशी भाजपच्या दिग्गज नेत्याची सुभाष देशमुखांच्या निवासस्थानी हजेरी!

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या राजकीय प्रवासात व त्यांना आमदार बनविण्यामागे पोपट देशमुख यांचे मोलाचे योगदान असल्याचे मानले जाते. शांत, संयमी व मनमिळावू स्वभावामुळे त्यांना परिसरात विशेष मान होता.

Popat Ganpatrao Deshmukh passed away
Pandharinath Pathare Death : आमदार बापूसाहेब पठारे यांच्या कुटुंबावर शोककळा : बंधू पंढरीनाथ पठारे यांचे निधन

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्यावर मंगळवारी (ता. १२) सकाळी ९ वाजता पेनूर (ता. मोहोळ) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com