Pune University Viral Rap Song Sarkarnama
पुणे

ABVP Protest At Pune University: अश्लील रॅप साँग शूट प्रकरणी अभाविप आक्रमक; पुणे विद्यापीठात जोरदार राडा

ABVP Protest On Case of Obscene Rap Song Shoot: वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची सुरु असलेली बैठकही यावेळी अभाविपनं उधळून लावली...

सरकारनामा ब्यूरो

Pune University News: पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एका अश्लील रॅप साँगचे शूटींग केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला आहे. विद्यापीठातील मुख्य इमारतीतच हे अश्लील रॅप साँग शूट केल्यामुळे या प्रकाराची चांगलीच चर्चा झाली.याच पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद(अभाविप) आक्रमक पावित्रा घेतला असून विद्यापीठात प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली असून बैठकही उधळून लावली आहे.

शुभम जाधव (Shubham Jadhav) नावाच्या मुलाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात रॅप साँग शूट केलं होतं. या रॅप साँगसाठी विद्यापीठातील काही कर्मचाऱ्यांनीच तोंडी परवानगी दिल्याची माहिती त्याने दिली होती. मात्र, यानंतर राजकीयसह समाजाच्या सर्वच क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.यानंतर आता अभाविपनं या रॅप शूट प्रकरणी आक्रमक पावित्रा घेत आंदोलन केलं आहे.

यावेळी आंदोलकांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच वरिष्ठ पदाधिकार्यांची सुरु असलेली बैठकही यावेळी अभाविपनं उधळून लावली. यावेळी रॅप साँग प्रकरणी प्रशासनावर अनेक सवालही करण्यात आले. तसेच काही विद्यापीठाच्या काही वस्तूंची तोडफोड करण्यात आल्याची माहितीही समोर येत आहे.

या रॅप साँग शुट प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून (Savitribai Phule Pune University) उच्चस्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. या उच्चस्तरीय चौकशी समितीकडून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहे. या समितीमध्ये भाग्यश्री मंठाळकर, प्रसेंजित फडणवीस, निवृत्त कॅप्टन चंद्रशेखर चितळे, डॉ. विलास आढाव यांचा समावेश आहे. या रॅप साँग शुट प्रकरणाची चौकशी करून याबाबतचा अहवाल एक महिन्यात सादर करण्याचे निर्देश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांनी दिले आहेत.

दरम्यान, या रॅप साँग शुट प्रकरणी चतुर्शृंगी पोलीस ठाण्यात शुभमवर गुन्हा दाखल झाला. मात्र, अद्याप त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच आता विद्यापीठात रॅप साँग शुटींगला कुणी परवानगी दिली? त्याच्यांवरही कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणात नेमकं दोष कुणाचा? हे विद्यापीठाने नेमलेल्या उच्चस्तरीय चौकशी समितीने अहवाल दिल्यानंतरच समोर येणार आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT